शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जेसीबी, मिक्सरवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:36 IST

रेल्वे उड्डाणपुलाचे काम करताना कंत्राटदाराने अनधिकृतरीत्या मिक्सरच्या सहाय्याने काँक्रीट तयार केल्याच्या कारणावरुन २७ आॅगस्ट रोजी जेसीबी मशीन आणि काँक्रिट मिक्सरवर कारवाई करत ही दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात लावण्यात आली. त्यामुळे पूल उभारणीचे काम बंद पडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : रेल्वे उड्डाणपुलाचे काम करताना कंत्राटदाराने अनधिकृतरीत्या मिक्सरच्या सहाय्याने काँक्रीट तयार केल्याच्या कारणावरुन २७ आॅगस्ट रोजी जेसीबी मशीन आणि काँक्रिट मिक्सरवर कारवाई करत ही दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात लावण्यात आली. त्यामुळे पूल उभारणीचे काम बंद पडले आहे.येथील पालम नाका भागात रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे काम सुरु व्हावे, यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. काही दिवसांपूर्वीच कामाला प्रारंभ झाला होता. उड्डाणपुलाला जोडणारे खांब उभारण्यासाठी ४० ते ५० फुटापर्यंत खोल खड्डे तयार करुन त्यात सिमेंट काँक्रीट भरले जात आहे. २७ आॅगस्ट रोजी हे काम सुरु असताना उपविभागीय अधिकारी अमोलसिंह भोसले यांनी इसाद रोडवर कामाच्या साईटला भेट दिली. तेव्हा सिमेंट काँक्रिट मिक्सर (एम.एच.२१ एक्स ३२६५) मध्ये वाळू आणि खडी मिक्स केली जात होती. या सहाय्याने काँक्रिट तयार केले जात होते. तर जेसीबी मशीन (क्र.एचएआर थ्रीडीक्स ५५ टी-०१८६०६९७) वाळू काँक्रिट मिक्सरमध्ये टाकली जात होते. तयार केलेले काँक्रिट ६ एमक्यू हे नाशवंत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्यामुळे उपविभागीय अधिकाºयांनी रिकामे काँक्रिट मिक्सर व जेसीबी मशीन पोलीस ठाण्यात आणून लावली. उपविभागीय अधिकाºयांच्या आदेशावरुन पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही वाहने पोलीस ठाण्यातून सोडली नसल्याने उड्डाणपुलाचे काम ठप्प पडले होते.