शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीला दोन टीएमसीची गरज

By admin | Updated: July 25, 2016 01:07 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण जुलैअखेरीसही मृतसाठ्यातच आहे. मृतसाठ्यातील तूट भरून जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी २ टीएमसी पाण्याची गरज आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण जुलैअखेरीसही मृतसाठ्यातच आहे. मृतसाठ्यातील तूट भरून जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी २ टीएमसी पाण्याची गरज आहे. सध्या धरणात वरच्या भागातून १८८२ क्युसेक्सने आवक सुरू आहे.जायकवाडी धरणातील जिवंत साठा यंदा मार्च महिन्यातच संपला होता. तेव्हापासून मृतसाठ्यातील पाण्याचा वापर केला जात आहे. या धरणाची जिवंत साठ्याची क्षमता २१७१ दलघमी इतकी आहे. तर मृतसाठ्याची क्षमता ७३८ दलघमी आहे. १ जुलैपर्यंत मृतसाठ्यातूनही सुमारे २६५ दलघमीचा उपसा झाला होता. मात्र, त्यानंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काहींसा पाऊस झाल्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरू झाली. शिवाय वरच्या धरणांतूनही पाण्याचा विसर्ग सुरू झाला. त्यामुळे आतापर्यंत धरणात सुमारे २०० दलघमी पाण्याची आवक झाली. तरी हे धरण अजूनही मृतसाठ्यातच आहे. रविवारी जायकवाडीच्या मृतसाठ्यात ६८१ दलघमीपर्यंत मृतसाठा पोहोचला. त्यामुळे मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी ५७ दलघमी म्हणजे सुमारे अडीच टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यानंतरच जिवंत साठ्यात पाणी साठण्यास सुरुवात होईल. आतापर्यंतची ही सर्वाधिक वाईट परिस्थिती असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याआधी याच तारखेला २०११ साली धरणाच्या जिवंत साठ्यात ३५२ दलघमी साठा होता. २०१२ साली ७ दलघमी, २०१३ साली शून्य, २०१४ साली ४१ दलघमी पाणीसाठा होता.