शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

'जय श्रीराम'चा जयघोष

By admin | Updated: April 16, 2016 01:37 IST

नांदेड :श्रीराम नवमीनिमित्त श्री रामजन्मोत्सव समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या मिरवणूकीत लाखो भाविकांनी सहभाग नोंदविला़ रॅलीतील जय श्रीराम च्या जयघोषाने परिसर दुमदुमला

नांदेड :श्रीराम नवमीनिमित्त श्री रामजन्मोत्सव समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या मिरवणूकीत लाखो भाविकांनी सहभाग नोंदविला़ रॅलीतील जय श्रीराम च्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता़ श्रीरामाची महती सांगणारे भजन अन् भक्तीगीतांवर हजारो भाविकांची एका तालात साथ लक्षवेधी ठरली़ रात्री अकरा वाजेपर्यंत सुरु असलेल्या या मिरवणुकीसाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता़ शहरातील गाडीपुरा येथील श्री हनुमान मंदिरात श्रीराम आरतीने मिरवणुकीस प्रारंभ झाला़ त्यासाठी सकाळपासूनच राम भक्तांचे जत्थे हनुमान मंदिर परिसरात जमत होते़ यानंतर रेणूकामाता मंदिर येथे आरती झाली़ त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली़ महावीर चौक, वजिराबाद मार्गे ही मिरवणुक निघाली होती़ दरम्यान, मिरवणुकीत भव्य १३ फुट उंचीच्या श्रीराम मुर्तीची भक्तांकडून ठिकठिकाणी आरती करण्यात आली़ रॅलीत लाखांवर भक्तांनी सहभाग नोंदवला़ मिरवणुकीत श्री गुरु गोविंदसिंघजी, महामानव डॉ़बाबासाहेब आंबेडकर, जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्यासह अनेक महापुरुषांचे तैलचित्र लावण्यात आली होती़ शहरभर भगव्या पताका व झेंडे लावण्यात आले होते़ जय श्रीरामच्या जल्लोषपूर्ण घोषणा देत हजारो तरूण रॅलीत सहभागी झाले होते़ राम-नामाची महती सांगणाऱ्या गीतांवर हजारो तरुण एका तालात टाळ्या वाजून साथ देत होते़ त्यामुळे वातावरण भक्तीमय झाले होते़ कलामंदिर मार्गे शिवाजीगर, श्रीनगर मार्गे ही मिरवणूक अशोकनगर येथील श्री हनुमान मंदिर येथे पोहोचली़ याठिकाणी रात्री उशिरा सामुहिक आरतीने मिरवणुक विसर्जित झाली़दरम्यान, मिरवणुका जस-जशा पुढे जात होत्या़ त्या पाठीमागे स्वंयसेवकांचे एक पथक रस्त्यावर पडलेली पाणी पाऊच, कचरा उचलत होते़ तर काही तरुणांनी रस्ता सफाई करुन स्वच्छतेचा संदेश दिला़ (प्रतिनिधी) मराठवाड्यातील दुष्काळस्थिती ठळकपणे उमटविणारा देखावा तयार करण्यात आला होता़ यामध्ये अत्यल्प पावसामुळे पडलेला दुष्काळ आणि त्यातून निर्माण झालेली भयावह परिस्थिती, पावसाअभावी वाळलेली झाडे़ त्यात सावकाराकडून चाललेली पिळवणुक आदीसह शेतकरी आत्महत्या यावर आधारीत देखाव्यानी सर्वांचे लक्ष वेधले़ ४श्रीराम मंदिराची प्रतिकृती विद्युत रोषणाईसह उभारण्यात आली होती़ त्यापाठोपाठ हनुमानाची वानरसेना आणि श्रीराम राज दरबार होता़ यावेळी देखाव्यामध्ये श्रीराम, लक्ष्मण, सिता आणि हनुमान यांचा देखावा अधिक लक्ष वेधून घेत होता़ या भव्य रॅलीतील देखावे पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली होती़ ४भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा देशभक्तीपर देखावा तयार केला होता़ याठिकाणी देशभक्तीपर गीते सुरू होती़ दरम्यान, ठिकठिकाणी मिरवणूकीत सहभागी भक्तांकरीता अन्नदान आणि पाणी वाटप करण्यात येत होते़