शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जपानच्या पर्यटक महिलेस गोव्यात लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2016 01:12 IST

औरंगाबाद : भारतात पर्यटनासाठी आलेल्या जपानी महिलेस गोव्यातील एका रेस्टॉरंटमध्ये कॉफी आणि बर्गरमधून गुंगीचे औषध देऊन तिचे किमती सामान लुटण्यात आले.

औरंगाबाद : भारतात पर्यटनासाठी आलेल्या जपानी महिलेस गोव्यातील एका रेस्टॉरंटमध्ये कॉफी आणि बर्गरमधून गुंगीचे औषध देऊन तिचे किमती सामान लुटण्यात आले. नियोजित प्रवासात औरंगाबादला आल्यानंतर तिने क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. क्रांतीचौक पोलिसांनी हा गुन्हा पुढील तपासासाठी उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांकडे वर्ग केला.क्रांतीचौक पोलिसांनी सांगितले की, जपानची २५ वर्षीय महिला पर्यटनासाठी भारतात आलेली आहे. ५ आॅक्टोबर रोजी ती गोव्यात आली. तेथील एका २५ ते ३० वर्षे वयाच्या तरुणासोबत तिची ओळख झाली. त्या तरुणाने तिला गोवा पर्यटनासाठी मदतही केली. उत्तर गोवा भागातील पोरव्हरिम येथील एका रेस्टॉरंटमध्ये त्याच्यासोबत तिने कॉफी प्राशन केली आणि बर्गरही सेवन केले व तिची शुद्ध हरपली. काही वेळानंतर ती शुद्धीवर आली तेव्हा तिच्या बॅगेतील कॅनान कंपनीचा कॅमेरा, लॅपटॉप, महागडा हार्डडिस्क, रोख ८ हजार रुपये, १३० अमेरिकन डॉलर, जापनीज बँकेचे दोन क्रे डिट कार्ड आणि एक डेबिट कार्ड असा सुमारे ६८ हजारांचा ऐवज चोरीस गेल्याचे आढळले. त्या महिलेने पूर्वनियोजित प्रवासासाठी खाजगी ट्रॅव्हल्स बसचे औरंगाबादचे तिकीट काढलेले होते. ही घटना उघडकीस आली तेव्हा तिच्यासोबत असलेला तो तरुण काही काळ गायब झाला होता. त्यानंतर तो पुन्हा तिला भेटला. औरंगाबादच्या बसमध्ये बसून देण्यासाठी तो आला होता. ही चोरी कोणीतरी चोरट्यांनी केली असावी, असे त्याने पर्यटक महिलेस सांगितले होते. औरंगाबादच्या गाडीचे तिकीट काढलेले असल्याने गोवा पोलिसांकडे तक्रार न देता तिने औरंगाबादला येणे पसंत केले. ही चोरी तिच्यासोबत असलेल्या तरुणानेच केली असावी,अशी खात्री बस प्रवासात तिला पटली. त्यामुळे औरंगाबादेत उतरल्यानंतर क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तिने तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक नागनाथ कोडे यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून हा गुन्हा पुढील तपासासाठी पोरव्हरिम पोलीस ठाण्यात वर्ग करण्यासाठी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठविला.