शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
4
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
5
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
6
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
7
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
8
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
9
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
10
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
11
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
12
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
13
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
14
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
15
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
16
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
17
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
18
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
19
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
20
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...

सोयी-सुविधांचे कामही जपानी कंपन्यांच करणार

By admin | Updated: June 17, 2014 01:05 IST

औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पांतर्गत औरंगाबादेतील शेंद्रा ते बिडकीन परिसरात तब्बल साडेदहा हजार हेक्टरवर आंतरराष्ट्रीय दर्जाची औद्योगिक वसाहत उभारण्यात येणार आहे.

औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पांतर्गत औरंगाबादेतील शेंद्रा ते बिडकीन परिसरात तब्बल साडेदहा हजार हेक्टरवर आंतरराष्ट्रीय दर्जाची औद्योगिक वसाहत उभारण्यात येणार आहे. औरंगाबादच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाला चालना देणाऱ्या या प्रकल्पात मूलभूत सोयी-सुविधांसह नवीन शहरे उभारण्याचे कामही जपान येथील कंपन्यांच करणार आहेत. यासाठी जपान सरकारने निविदा प्रक्रियाही सुरू केली आहे.एमआयडीसी, सीएमआयए आणि सीआयआय पदाधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ नुकतेच जपान येथे तीनदिवसीय दौऱ्यावर गेले होते. दौऱ्याहून परतल्यावर मिलिंद कंक आणि प्रशांत देशपांडे यांनी पत्रकारांना डीएमआयसी प्रकल्पासंदर्भात माहिती दिली. औरंगाबादेत ‘स्मार्ट सिटी’ उभारण्यासाठी जपानच्या कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. डीएमआयसीमध्ये संकल्पना व पर्यवेक्षण, वॉटर प्लांट, अर्बन प्लानिंग कन्सल्टेशन, माहिती तंत्रज्ञान, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, वॉटर कन्सल्टेशन आदी कामे करण्यात येतील. पुढील दोन वर्षांमध्ये पायाभूत सुविधांचे जाळे पसविण्यात येईल. वाकायामा स्टेटच्या गव्हर्नरने डीएमआयसी प्रकल्पासह महाराष्ट्रात पर्यटन कसे वाढेल, बिझनेस ट्रेंड वाढावा या दृष्टीने काम सुरू असल्याचे शिष्टमंडळास सांगितले. स्वप्नातील डीएमआयसी प्रकल्पकेंद्र शासनाने मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पात मूलभूत सोयी-सुविधा देण्यासाठी खास आर्थिक तरतूदही केली. ज्या ठिकाणी नवीन शहरे निर्माण करण्यात येणार आहेत येथे अत्याधुनिक ट्रान्सपोर्ट सुविधा, ड्रेनेज, गुळगुळीत रस्ते, विजेचे केंद्र तयार करण्यात येतील. या प्रकल्पात जपान सरकार ४५६ कोटी रुपयांची मदत करणार आहे. जपान सरकारच्या वित्तीय आणि तांत्रिक साहाय्यतेने रेल्वेमार्गच्या आजूबाजूला २४ शहर निर्माण केले जातील. डीएमआयसीचे शहर अत्यंत सुंदर राहतील. एकापेक्षा एक सरस आर्किटेक्ट, अभियंत्यांची यासाठी मदत घेतली जाणार आहे. या शहरांमध्ये अत्याधुनिक सार्वजनिक बस सुविधा राहील. सौरऊर्जा आणि गॅसवरील विजेचे केंद्र राहतील. डीएमआयसीमधील शहरे २०१८ पर्यंत पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे.