शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जानेवारीतही ट्रूजेटचे विमान आठवड्यातून तीनच दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:58 IST

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ट्रूजेटचे विमान जानेवारीमध्ये आठवड्यातून तीन दिवस उड्डाण करणार आहे. डिसेंबरमध्ये आठवड्यातून तीन दिवस उड्डाण केल्यानंतर या विमानोचे वेळापत्रक नियमित होईल, असे सांगण्यात आले; परंतु प्रत्यक्षात आठवड्यातील चार दिवस हे विमान उड्डाण करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ट्रूजेटचे विमान जानेवारीमध्ये आठवड्यातून तीन दिवस उड्डाण करणार आहे. डिसेंबरमध्ये आठवड्यातून तीन दिवस उड्डाण केल्यानंतर या विमानोचे वेळापत्रक नियमित होईल, असे सांगण्यात आले; परंतु प्रत्यक्षात आठवड्यातील चार दिवस हे विमान उड्डाण करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.ट्रूजेट कंपनीतर्फे २५ जुलै २०१५ पासून औरंगाबाद-हैदराबाद-तिरुपती विमानसेवा सुरू करण्यात आली. औरंगाबादहून तिरुपतीला जाणाºया बालाजी भक्तांना आणि हैदराबादहून शिर्डीला साई दर्शनासाठी येणाºया भाविकांची या विमानसेवेने मोठी सुविधा झाली. ट्रूजेट कंपनीतर्फे अचानक डिसेंबरमध्ये आठवड्यातील बुधवार, गुरुवार आणि रविवार या तीन दिवशीच विमानाचे उड्डाण करण्याचे नियोजन करण्यात आले. हैदराबाद येथून सायंकाळी ७.३० वाजता विमान चिक लठाणा विमानतळावर येईल आणि रात्री ८ वाजेच्या सुमारास हे विमान हैदराबादसाठी उड्डाण घेते. डिसेंबरमध्ये मर्यादित सेवेमुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. महिनाभराचे हे वेळापत्रक जानेवारीत बदलून या विमानाचे दररोज उड्डाण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती; परंतु जानेवारीत हे वेळापत्रक कायम असल्याचे दिसते. विमान कंपन्यांकडूनही औरंगाबादऐवजी शिर्डी विमानतळाला प्राधान्य वाढत असल्याचे दिसते. डिसेंबरनंतर आता जानेवारीतही आठवड्यातून तीनच दिवस औरंगाबादेत विमानसेवा देऊन शिर्डीला प्राधान्य देण्याची शक्यता व्यक्त होत आहे.फेब्रुवारीपासून नियमितयासंदर्भात ट्रूजेट कंपनीच्या वाणिज्य विभागाचे अधिकारी सेंथील राजा म्हणाले, चिकलठाणा विमानतळावर धावपट्टीच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे सायंकाळीच उड्डाण करावे लागते; परंतु या वेळेत नियोजन अशक्य होत असल्याने जानेवारीतही आठवड्यातून तीन दिवस उड्डाणाचे नियोजन केले आहे. फेब्रुवारीपासून विमान नियमित होईल. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनीही आठवड्यातून तीन दिवस उड्डाणाच्या नियोजनास दुजोरा दिला.