शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

जामवाडीकर स्वस्त धान्यापासून वंचित

By admin | Updated: June 13, 2014 00:36 IST

जामवाडी: जालना तालुक्यातील जामवाडी येथील स्वस्तधान्य दुकानाचा प्रश्न मागील चार वर्षापासून रेग्ाांळलेला आहे.

जामवाडी: जालना तालुक्यातील जामवाडी येथील स्वस्तधान्य दुकानाचा प्रश्न मागील चार वर्षापासून रेग्ाांळलेला आहे. चार वर्षात परिसरातील पाच गावांच्या दुकानाला गाव जोडले. आता मागील दहा महिन्यांपासून इतर कोणत्याही गावाला जामवाडीची दुकान जोडली नसल्याने ग्रामस्थांना धान्यापासून वंचित रहावे लागत आहे.दरम्यान गावाच्या शिधापत्रिका धारकांच्या कोट्यातील धान्य व रॉकेल दहाही महिन्यांचे एकत्रीत वाटप करावे अशी मागणी होत आहे.जामवाडीची लोकसंख्या तीन हजार आहे. गावात एपीएलचे २२५ तर बीपीएलचे ७१, अंत्योेदयचे २५ कार्डधारक आहेत. शिवाय अन्न सुरक्षा योजनेची लाभार्थीच अद्याप निश्चत झालेली नाही. गावातील स्वस्त धान्याची दुकान विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडे होती. सोसायटीने चार वर्षापूर्वीच गावात दुकान चालविण्यास असमर्थता दर्शविल्याने ही दुकान दुसऱ्या गावातील स्वस्त धान्य दुकानाला जोडली होती. आता पर्यंत ही दुकान पानशेंद्रा, गोंदेगाव, धावेडी, नागेवाडी व तांदूळवाडी येथील दुकानांना सहा महिने ते एकवर्ष अशा कालवधीसाठी जोडलेली आहे. दुकानाबाहेर गावाच्या दुकानाला जोडण्यात येत असल्याने काही ग्रामस्थांना स्वस्तधान्य मिळत नाही. एका दुकानदाराने धान्य परस्पर उचलून त्याचा काळाबाजार केला. याबाबत ग्रामस्थांनी जिल्हापुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्यानंतर त्या दुकानाची चौकशी लावण्यात आली. मात्र ही चौकशी अद्यापही पूर्ण झालेली नाही ती लालफितीत अडकली आहे.तेव्हा पासून त्या दुकानदाराकडूनही ही दुकान काढण्यात आली. त्यामुळे मागील दहा महिन्यापासून गावाची दुकान फक्त नावालाच आहे. ही दुकान कोणत्याही गावाला जोडली नसल्याने ग्रामस्थ धान्य व रॉकेलपासून वंचित रहावे लागत आहे. धान्य पुरवठा करण्याची मागणी शिधापत्रिकाधारकांतून होत आहे. (वार्ताहर)कायमस्वरूपी दुकान द्यागावात मागील चार वर्षापासून स्वस्तधान्य दुकानाचा खो- खोचा खेळ चालू आहे. त्यातच मागील दहा महिन्यांपासून ही दुकान कोणत्याही दुकानाला जोडलेली नाही. त्यासाठी जिल्हा पुरवठा विभागही लक्ष देत नाही. एकीकडे शासन अन्न सुरक्षा योजने सारखी महत्वाकांक्षी योजना राबवीत आहे. दुसरीकडे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावालाच धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. मागील चार वर्षांपासून प्रशासन फक्त वेळो- वेळी दुकान दुसऱ्या दुकानाला जोडते मात्र कायमस्वरूपी काहीच उपाय योजना केली नाही. त्यामुळे गावात कायमस्वरूपी स्वस्त धान्याचे दुकान कार्यान्वित करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.आचारसंहिता आडसध्या आचार संहिता असल्याने गावात नव्याने दुकाना संबधी जाहीर प्रगटन काढता येत नाही तसेच दुकान दुसऱ्या दुकानाला जोडण्याचे अधिकार हे तहसीलदारांना आहे. असे जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड यांनी सांगितले.गावातील राजकीय पुढारी आपल्याच मर्जीतील दुकानाला हे दुकान जोडावे म्हणून शिफारशी करत आहे. त्यामुळे एकावे कुणाचे असा पेच निर्माण झाला असल्याचे तहसीलदार जे.डी. वळवी यांनी सांगितले.