जालना : जागतिक पातळीवर २३ मे रोजी इंडो-भूतान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विटी-दांडू स्पर्धेसाठी भारतीय संघात जालन्यातील खेळाडूंची निवड करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय विटी दांडू महासंघाचे सचिव प्रशांत नवगिरे यांनी दिली.भारतीय संघाच्या कर्णधारपदी कृष्णा तारडे (जालना) यांची निवड करण्यात आली आहे. तसेच संघामध्ये गौरव नवगिरे, सचिन वाघचौरे, अनिल राठोड, अभिषेक जाधव, रशीद खान, गणेश ठाकूर, ज्ञानेश्वर बदर, अनिकेत दहिफळे (मध्यप्रदेश), महेश पाटील (गुजरात), नितीन मराठे (गोवा), निलेश हिवाळे, एम. संजीव (तेलंगणा), निखील कुमार (आंध्रा), कार्तिक (कर्नाटक) यांचा समावेश आहे. तर भारतीय महिला कर्णधारपदी जालन्याची सविता बोर्डे हिची निवड करण्यात आली आहे. महिलांच्या संघात कोमल भोईटे, पूजा काबरा, फरिहिन, पूजा भोईटे, निकिता सुंदरडे, पूजा गुसिंगे, स्रेहल जाधव, सारिका घेवंदे, प्रिया भाग्यवान, ताजी पंडा, प्रतीक्षा वाकळे, ज्ञानेश्वरी माळी, भाग्यश्री माळी यांचा समावेश आहे. या दोन्ही संघाचे प्रशिक्षक म्हणून विजय गाडेकर, संग्राम तारडे, प्रतीक्षा नवगिरे, संघ व्यवस्थापक म्हणून गजानन वाळके, राकेश खैरनार, गणेश ढोबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय संघ जालना येथून २० मे रोजी रवाना होणार आहे. या संघातील खेळाडुंना असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अर्जुनराव खोतकर, राष्ट्रीय सचिव प्रशांत नवगिरे, पंडितराव भुतेकर, विष्णू पाचफुले, उद्योजक कैलास लोया, विठ्ठलराव म्हस्के, विद्या नवगिरे, बप्पासाहेब म्हस्के, सुभाष पारे, शेख चाँदआदींनी शुभेच्छा दिल्या.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात जालन्याचे खेळाडू
By admin | Updated: May 18, 2015 00:17 IST