शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात आमदार, माजी मंत्री येणार आमने-सामने

By admin | Updated: August 27, 2014 01:01 IST

संजय कुलकर्णी , जालना विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरूवात झाली आहे. जालना विधानसभा मतदार संघात शिवसेना व काँग्रेस या दोन पक्षांत निवडणुकीत सामना रंगणार असला

संजय कुलकर्णी , जालनाविधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरूवात झाली आहे. जालना विधानसभा मतदार संघात शिवसेना व काँग्रेस या दोन पक्षांत निवडणुकीत सामना रंगणार असला तरी बसपा, भारिप आणि मनसे उमेदवारांचाही त्यात महत्वाचा सहभाग राहिल, अशी चिन्हे आहेत. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल व माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात लढतीचे चित्र राहिल, अशी शक्यता आहे.हा मतदारसंघ मागील पंधरा वर्षांपूर्वी शिवसेना-भाजपा युतीचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र मागील निवडणुकीत काँग्रेसतर्फे कैलास गोरंट्याल विजयी झाले. त्यानंतर गेल्या अडीच वर्षापूर्वी जालना नगरपालिका व पंचायत समितीही काँग्रेस आघाडीच्या ताब्यात आली. तीन-चार महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या लाटेने जालना विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवेंना मताधिक्य मिळाले. वास्तविक गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांना मताधिक्य मिळाले होते. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे आ. गोरंट्याल यांनी जनतेसमोर आपल्या कार्याचा लेखाजोखा सादर करण्याची तयारी दर्शविली आहे. पक्षातून अन्य इच्छुकांची नावेही समोर येत आहेत. १९ आॅगस्ट रोजी काँग्रेसच्या राज्य निवड समितीसमोर आ. गोरंट्याल यांच्यासह माजी आ. शकुंतला शर्मा, डॉ. संजय लाखे पाटील, प्रा. सत्संग मुंढे यांनीही मुलाखती दिल्या. या सर्वांनी आपल्या कार्याचा आढावा पक्षश्रेष्ठींसमोर सादर केला. निवड समिती ठरवेल, त्याच नावावर उमेदवारीचे शिक्कामोर्तब होईल. तरीही गोरंट्याल यांची उमेदवारी सद्यस्थितीत पक्की मानली जात आहे. या मतदारसंघात काँग्रेसचा प्रतिस्पर्धी पक्ष म्हणून शिवसेनेकडे पाहिले जाते. मागील निवडणुकीत घनसावंगी मतदारसंघातून पालकमंत्री राजेश टोपेंना तुल्यबळ लढत दिलेले माजी मंत्री अर्जुन खोतकर पुन्हा आपल्या जुन्या मतदारसंघाकडे वळलेले आहेत. मोर्चा, धरणे, आंदोलनांच्या माध्यमातून काही दिवसांमध्ये खोतकर यांनी शक्तीप्रदर्शन दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवसेनेतून भास्कर अंबेकर, विष्णू पाचफुले हेही इच्छूक आहेत. शेवटी पक्षाचा निर्णयच अंतिम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रशीद पहेलवान यांनी बहुजन समाज पार्टीत प्रवेश केला. तेही बसपाकडून नशीब आजमावणार असल्याने निवडणुकीला चांगलाच रंग भरणार आहे. दुसरीकडे मनसेकडून रवी राऊत यांनीही उमेदवारीसाठी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर निकाळजे हेही पक्षाकडून इच्छूक आहेत. गोरंट्याल यांनी जायकवाडी पाणीपुरवठा योजनेच्या पूर्णत्वासाठी सत्ताधाऱ्यांसमोरच आपली ताकद पणाला लावली. शहरातील अनेक भागात तयार झालेले रस्ते, महिला व बाल रुग्णालयाच्या नूतन इमारत व अंतर्गत जलवाहिनीसाठी मिळवावयाचा निधी यासाठीही प्रयत्न केले. तर जायकवाडी पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तत्कालीन शिवसेना नगराध्यक्ष भास्कर अंबेकर यांच्या कार्यकाळात तयार होऊन शासनाकडे सादर झाला. अर्जुन खोतकर यांनी न्यायालयात दाद मागितल्याने योजनेसाठीचा पहिला हप्ता मिळाला, अशा दावे-प्रतिदाव्यांनी गाजलेली जायकवाडी पाणीपुरवठा योजना आगामी काळात पुन्हा चर्चेत राहणार यात शंका नाही.