लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेतील सभागृहनेतेपदी विकास जैन यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून, सोमवारी त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी पक्षातील नेत्यांसह नगरसेवक, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. महापालिका प्रवेशद्वारासमोर फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला.खा. चंद्रकांत खैरे यांनी सभागृह नेता यांच्या दालनाच्या नूतनीकरणाचे फीत कापून उद्घाटन केले. यानंतर विकास जैन यांनी सभागृहनेतेपदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी सुहास दाशरथे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, मुन्ना त्रिवेदी, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, संतोष जेजूरकर, अनिल पोलकर, राजू वैद्य, मनपा गटनेते मकरंद कुलकर्णी, सभापती गजानन बारवाल, ऋषिकेश खैरे, त्र्यंबक तुपे, राजेंद्र जंजाळ, मनोज बल्लाळ, सचिन खैरे, शिल्पाराणी वाडकर, स्मिता नागरे, कीर्ती शिंदे, संगीता सानप, यशश्री बाखरिया, आशा भालेराव आदींची उपस्थिती होती.
जैन यांनी स्वीकारली सभागृह नेत्याची सूत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:30 IST