शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

३५ वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद

By admin | Updated: January 14, 2017 00:27 IST

लातूर : १९८१ साली रेणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घर जाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या रेकॉर्डवरील फरार आरोपींच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल ३५ वर्षांनंतर आवळल्या आहेत.

लातूर : १९८१ साली रेणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घर जाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या रेकॉर्डवरील फरार आरोपींच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल ३५ वर्षांनंतर आवळल्या आहेत. ३५ वर्षांपासून फरार असलेल्या बबऱ्या शितोळ्या भोसले (५७) याला घाटशिळ (तुळजापूर) येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. चाकूर तालुक्यातील मुळचा कारेवाडी येथील असलेला बबऱ्या शितोळ्या भोसले याच्याविरुद्ध १९८१ साली रेणापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ०९/१९८१ कलम ४३६ भादंविनुसार गुन्हा दाखल होता. त्याच्या विरोधात झोपडपट्टीतील घर जाळल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल असून, तो घटनेपासून आजपर्यंत फरारच होता. दर महिना-दोन महिन्यांनी बबऱ्या भोसलेचे कुटुंब हे रोजगारानिमित्त स्थलांतर होत असे. सातत्याने त्याचे होणारे स्थलांतर यामुळे तो गेल्या ३५ वर्षांपासून रेकॉर्डवरील फरार गुन्हेगार होता. बबऱ्या शितोळ्या भोसले याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. गेल्या ३५ वर्षांपासून पोलिसांना तो गुंगारा देत होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला बबऱ्या शितोळ्या भोसले हा वेताळ झोपडपट्टी घाटशिळ (तुळजापूर) येथे राहत असल्याची माहिती मिळाली. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी खातरजमा करून त्याला जेरबंद करण्याचे नियोजन केले. गुरुवारी रात्री त्याच्या राहत्या घरातून त्याला जेरबंद केले. या पथकात बालासाहेब मस्के, सदानंद योगी, रणवीर देशमुख, भिष्मानंद साखरे, थडकर यांचा समावेश आहे.