शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बचत गटांची चळवळ थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:30 IST

नांदेड : मागील दीड वर्षापासून गट समन्वयकांच्या अनेक जागा रिक्त असल्याने ग्रामीण भागातील महिला बचतगटांची चळवळ थंडावली आहे़ आर्थिक पुरवठा करणाºया बँकांना बचत गटांच्या उन्नतीचे काहीच घेणे- देणे नसल्यामुळे अधिक कमकुवत झालेले बचत गट आता समन्वय नसल्याने वाºयावर आहेत़

भारत दाढेल ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मागील दीड वर्षापासून गट समन्वयकांच्या अनेक जागा रिक्त असल्याने ग्रामीण भागातील महिला बचतगटांची चळवळ थंडावली आहे़ आर्थिक पुरवठा करणाºया बँकांना बचत गटांच्या उन्नतीचे काहीच घेणे- देणे नसल्यामुळे अधिक कमकुवत झालेले बचत गट आता समन्वय नसल्याने वाºयावर आहेत़जिल्ह्यात गट समन्वयकांच्या १३ जागा रिक्त आहेत़ ३३ पैकी १९ जागेवर हे गट समन्वयक कार्यरत आहेत़ तसेच समुह संसाधन व्यक्तीच्या नियुक्त्याही करण्यात आल्या नाहीत़ प्रत्येक दहा गटासाठी एक समूह संसाधन व्यक्ती या प्रमाणे निवड होणे आवश्यक आहे़ गट समन्वयक व समूह संसाधन व्यक्ती नसल्याने या गटांना मार्गदर्शन मिळत नसल्याचे चित्र आहे़जिल्ह्यात १९८० साली बचत गटांसाठी योजना सुरू झाली तेव्हापासून आजपर्यंत १९ हजार ६०० बचत गट स्थापन झाले आहेत़ त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महिलांच्या सक्षमीकरणाची संधी आहे़ जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व गटसमन्वयक यांनी बँक मेळाव्याचे आयोजन करणे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत, अशा बँक शाखामध्ये बँक मेळावे घेणे आवश्यक आहे़दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाºया कुटुंबांच्या आर्थिक उन्नतीसाठी बचत गटांचे माध्यम आधारभूत ठरले असले तरी सध्या अनेक बचत गट मोडकळीस आले आहेत़ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत बचत गटांची चळवळ जोमाने सुरू होती़ परंतु प्रशासकीय यंत्रणा व बँकेच्या असहकार्यामुळे बचत गटांचा आर्थिक विकास थांबला आहे़ जिल्ह्यातील विविध बँक शाखेत डीआरडीच्या बचतगटांचे कर्ज प्रकरणे पडून आहेत़ या गटांना कर्ज पुरवठा करण्यास बँकांची तयारी नाही़ ‘विना कारण, विना तारण’ या तत्वावर बँकांनी बचत गटांना १ लाख २५ हजार रूपयापर्यंत कर्ज पुरवठा करणे आवश्यक आहे़ परंतु या तत्वांचा विसर बँकांना पडला आहे़ दारिद्र्य रेषेखालील बचत गटांची पत तसेच पाठपुरावा करणाºया यंत्रणेची कमतरता असल्याने या कर्ज प्रकरणांकडे कोणाचेही लक्ष नाही़दुसरीकडे प्रशासकीय स्तरावरून या गटांच्या विकासासाठी प्रयत्न करणारी यंत्रणा अपुरी पडत आहे़ त्यामुळे गटांची परिस्थिती दयनीय झाली आहे़ दरम्यान, बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाºया विविध उपक्रमांचाही विसर प्रशासनाला पडला आहे़