शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या ६८ शाखांमध्ये रविवारीही स्वीकारला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:31 IST

नांदेड: सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाडामुळे पीक विमा भरण्यास शेतकºयांना अनंत अडचणी येत आहेत. त्यात आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आॅफलाईन व मॅन्युअली पीक विमा स्वीकारला जात आहे. जिल्हा बँकेच्या ६८ शाखांमध्ये रविवारची सुटी असतानाही पीक विमा स्वीकारला जात असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाडामुळे पीक विमा भरण्यास शेतकºयांना अनंत अडचणी येत आहेत. त्यात आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आॅफलाईन व मॅन्युअली पीक विमा स्वीकारला जात आहे. जिल्हा बँकेच्या ६८ शाखांमध्ये रविवारची सुटी असतानाही पीक विमा स्वीकारला जात असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली.रविवारी जिल्हा बँकेत झालेल्या पत्रपरिषदेत आ. चिखलीकर यांनी आॅनलाईन प्रक्रियेमुळे वेळ लागत आहे. त्याचवेळी सॉप्टवेअरमधील तांत्रिक अडचणींनाही सामोरे जावे लागत आहे. या अडचणीबाबत आपण स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून मॅन्युअली पीक विमा स्वीकारण्याची विनंती केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांशी संपर्क साधून त्याबाबतची परवानगी घेतली. पीक विमा भरण्याची मुदत आणखी १५ दिवस वाढविण्याची मागणीही त्यांनी केली.जिल्हा बँकेतही पीक विमा स्वीकारला जात आहे. रविवार असला तरीही पीक विम्यासाठी शेतकºयांच्या रांगा लागल्या होत्या. जिल्हा बँकेच्या ६८ शाखांमध्ये पीक विमा स्वीकारला जात आहे. बँकेचे जवळपास ३०० कर्मचारी या कामी कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.पद्मश्री श्यामराव कदम यांच्या पुतळ्याचे काम झाले असून आॅगस्टमध्ये या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार असल्याचेही ते म्हणाले. जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पीक विमा भरण्यासाठी शेतकरी हवालदिल झाला आहे. अशी परिस्थिती असताना आपण वाढदिवस साजरा करणार नसल्याचे ते म्हणाले. रविवारी जिल्हा बँकेत कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हार, तुºयावर खर्च न करता कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले. भाजपा प्रवेशाबाबत आ. चिखलीकर यांनी नेहमीप्रमाणे संदिग्ध उत्तरे दिली.यावेळी जि.प. सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, माजी जि.प. सदस्य गणेश पाटील सावळे यांची उपस्थिती होती.