शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयासाठी ४०० लोककलावंतांचा जागर

By admin | Updated: May 29, 2017 00:25 IST

लातूर : ९० हजार शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट घेऊन काम करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाने लोककलावंतांकडून जागर सुरू केला आहे.

आशपाक पठाण । लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत लातूर जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. ३१ मार्च २०१८ अखेर जिल्हा हागणदारीमुक्त व्हावा, यासाठी ९० हजार शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट घेऊन काम करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाने लोककलावंतांकडून जागर सुरू केला आहे. जवळपास ४०० कलावंत गावोगावी जाऊन शौचालय बांधकामाचे महत्त्व पटवून देण्याचे काम करीत आहेत. वासुदेव, मसनजोगी आणि पांगूळही गावोगावी आरोळी ठोकत आहेत.गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी विडा उचललेल्या काही ग्रामपंचायतींना स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रशासनही पाठबळ देत आहे. जिल्ह्यात एकूण ७८३ ग्रामपंचायती आहेत. यातील ३९० ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या असून, उर्वरित ग्रामपंचायत क्षेत्रात शौचालय बांधकामाची जणू चळवळच उभी करण्यात आली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांचे मतपरिवर्तन करण्याचे काम हाती घेतले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकामासाठी १२ हजार रुपयांची शासन मदत देत आहे. ही मदत म्हणजे संबंधित लाभधारकांना प्रोत्साहन असून त्यांचेच आरोग्य सुदृढ राहावे, उघड्यावर कोणीही शौचास जाऊ नये, वैयक्तिक पर्यायाने गावचेही आरोग्य कसे सुरक्षित ठेवता येईल, यासाठी जिल्हा परिषद प्रशासन कामाला लागले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी ग्रामसेवक संघटना तसेच अन्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांंनाही हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी कामाला लावले आहे. त्यानुसार गुडमॉर्निंग पथकेही गावोगावी जात आहेत. उघड्यावर जाणाऱ्या नागरिकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अनोखे स्वागत केले जात आहे. तर काही ठिकाणी थेट पोलीस कारवाईही केली जात आहे. याशिवाय, लोककलावंतही गावोगावी शौचालय बांधकाम, आरोग्य, स्वच्छता याविषयी प्रबोधन करीत आहेत.