शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

जाधववाडीत शुकशुकाट

By admin | Updated: June 3, 2017 00:47 IST

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी आज शुक्रवार असल्याने जाधववाडीतील फळभाज्यांच्या अडत बाजाराला साप्ताहिक सुटी होती

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शेतकऱ्यांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी आज शुक्रवार असल्याने जाधववाडीतील फळभाज्यांच्या अडत बाजाराला साप्ताहिक सुटी होती. धान्याच्या अडत बाजारात मात्र गहू, बाजारी, तांदूळ, तुरीची ५४ टन आवक झाली; पण हमालांनी संपाला पाठिंबा दिल्याने तोलाई झाली नाही. ग्राहकांनीही पाठ फिरविल्याने या बाजारात शुकशुकाट जाणवत होता. कर्जमाफी मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी संपावर गेले आहेत. गुरुवारी संपाच्या पहिल्या दिवशी जाधववाडीतील अडत बाजारात टरबूज, टोमॅटो फेकून देणाऱ्या शेतकरी प्रतिनिधींना संतापलेल्या काही व्यापाऱ्यांनी मारहाण केल्याने मोठा गदारोळ झाला होता; पण आज अडत बाजाराला सुटी असल्याने परपेठेतून फळे, पालेभाज्या आल्या नाहीत. तिथे २० ते २५ किरकोळ विक्रेत्यांनी कालच्या शिल्लक भाज्या व फळे विक्रीला ठेवली होती. शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी या भागात फेरफटका मारला; पण किरकोळ विक्रेते शिल्लक भाज्या विक्री करताना पाहून ते निघून गेले. संपाच्या दुसऱ्या दिवशी धान्याच्या अडत बाजारात परपेठेतील आवकीवर मोठा परिणाम झाल्याचे जाणवले. एरव्ही दररोज परपेठेतून १५ ते २० ट्रक धान्य बाजारपेठेत येत असते. मात्र, आज परपेठेतून १६ टन गहू व ३२ टन तांदळाची आवक झाली. गंगापूर, पैठण आदी तालुक्यांतून ३ टन तुरी, आसपासच्या ग्रामीण भागातून १५ पोते गहू व १५ पोते बाजरीची आवक झाली. व्यापाऱ्यांनी सर्वमाल उतरून घेतला व ट्रकचालकांना रवाना केले. या आलेल्या धान्याची तोलाई, हर्राशी झालीच नाही. कारण, शेतकऱ्यांच्या संपाला हमालांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे दुपारपर्यंत हमाल कामावर आले नव्हते. म्हणून तोलाई होऊ शकली नाही, अशी माहिती कृउबाचे सचिव विजय शिरसाठ यांनी दिली. शेतकऱ्यांच्या संपामुळे धान्याच्या अडत बाजारात धान्याची आवक घटली, तसेच वार्षिक धान्य खरेदीही संपुष्टात आल्याने उठावही कमी झाला. यामुळे दिवसभर धान्याचा अडत बाजारात शुकशुकाट जाणवत होता. अनेक अडत्यांनी आज आपली दुकानेही उघडली नव्हती. ज्या अडत्यांनी दुकाने उघडली त्यांनी काम नसल्याने गटागटाने गप्पा मारून वेळ काढला. दुपारी ४ नंतर अडत्यांनी दुकाने बंद करून घरचा रस्ता धरला.