शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जाधववाडी कृउबात आज सभापतीची निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:11 IST

जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठीची निवडणूक उद्या १ सप्टेंबर रोजी होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठीची निवडणूक उद्या १ सप्टेंबर रोजी होणार आहे.जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय औताडे (काँग्रेस) यांच्या विरोधात भाजपच्या संचालकांनी आणलेला अविश्वास ठराव २२ रोजी पारित झाला होता. काँग्रेसचे ३ संचालक फोडण्यात भाजपला यश आले असून, १३ विरुद्ध शून्य एवढ्या फरकाने औताडे यांना पदावरून पायउतार व्हावे लागले होते. यामुळे सध्याच्या संचालकांमधूनच नवीन सभापती निवडीसाठी १ सप्टेंबरचा मुहूर्त काढण्यात आला आहे. बाजार समितीच्या हॉलमध्ये सकाळी ११.३० वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल. प्रथम उमेदवारी दाखल करणे, उमेदवारी मागे घेणे, आक्षेप नोंदविणे, अशी एकानंतर एक निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदान घेण्यात येणार आहे. साधारणत: दुपारी २.३० वाजता निकाल जाहीर करण्यात येईल. १८ संचालकांपैकी आजघडीला भाजपकडे १३ संचालकांचे बहुमत आहे. यात काँग्रेसचे बाबासाहेब मुगदल, राधाकिसन पठाडे व शिवाजी वाघ यांनी भाजपला साथ दिली, तसेच हमाल-मापाडी संचालक देवीदास कीर्तिशाही यांनीही काँग्रेसची साथ सोडून भाजपच्या ठरावाला पाठिंबा दिला.भाजपचे ७ संचालक, २ व्यापारी संचालक व ३ काँग्रेसचे संचालक व १ हमाल-मापाडी, असे १३ मते अविश्वास ठरावाच्या बाजूने पडले होते. सभापती निवडून येण्यासाठी १० मतांची आवश्यकता लागते. कोणी संचालक फुटले नाही तर भाजपचा सभापती होणार हे निश्चित. निवडणूक अधिकारी म्हणून सहायक निबंधक देवयानी वहाणे (भारस्वाडकर) काम पाहणार आहेत. त्यांना बाजार समितीचे सचिव विजय शिरसाठ सहकार्य करणार आहेत.