शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जाधववाडी बाजार समितीचा कारभार आजपासून आॅनलाईन; विरोध करणा-यांचे परवाने होणार रद्द 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 17:32 IST

जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवार ९ फेब्रुवारीपासून प्रत्यक्षात राष्ट्रीय कृषी बाजार ‘ई-नाम’ ला सुरुवात होणार आहे. यात प्रारंभी,  प्राथमिक स्वरूपात बाजार समितीअंतर्गत आॅनलाईन हर्राशी होणार आहे.

औरंगाबाद : जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवार ९ फेब्रुवारीपासून प्रत्यक्षात राष्ट्रीय कृषी बाजार ‘ई-नाम’ ला सुरुवात होणार आहे. यात प्रारंभी,  प्राथमिक स्वरूपात बाजार समितीअंतर्गत आॅनलाईन हर्राशी होणार आहे. या अंतर्गत पारंपरिक रोखेच्या व्यवहाराऐवजी शेतकर्‍यांच्या थेट बँकेच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. जे अडत्या किंवा खरेदीदार आॅनलाईन व्यवहाराला विरोध करतील त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यात येणार नाही, हे विशेष. 

शेतकर्‍यांची होणारी लूट थांबविण्यासाठी, शेतीमालाला रास्त भाव मिळावा व बाजार समितीमधील व्यवहारात पारदर्शकता निर्माण व्हावी, यासाठी केंद्र सरकार देशभर आॅनलाईन कृषी बाजार प्रकल्प राबवीत आहे. यासाठी ‘ई-नाम’ पोर्टल तयार करण्यात आले आहे. यासाठी राज्यात पहिल्या टप्प्यात ३० बाजार समिती निवडण्यात आल्या त्यातील औरंगाबादेतील बाजार समिती एक आहे. तीन महिने झाले पण येथे ‘ई-नाम’ला सुरुवात झाली नाही. याचा आढावा घेण्यासाठी  महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार बाजार समितीत आले होते. शुक्रवार ९ फेब्रुवारीपासून येथे प्राथमिक स्वरूपात ‘आॅनलाईन हर्राशी’ सुरूकरा, असे आदेश त्यांनी दिले.

या संदर्भात बाजार समितीचे सचिव विजय शिरसाट यांनी सांगितले की, बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारात आजपर्यंत ४७९१ शेतकर्‍यांची नोंदणी झाली आहे. त्यातील ३७९ शेतकर्‍यांनी ‘ई-नाम’ पोर्टलवर नोंदणी केली आहे. याशिवाय अडते व खरेदीदारांनीही पोर्टलवर नोंदणी केली आहे. केंद्र सरकारने कॉम्प्युटर व टेस्टिंग लॅब आदी सुविधांचा पुरवठा केला आहे. प्रत्येक सेल हॉलमध्ये स्वतंत्र केबिन तयार केली आहे. येत्या महिन्यात नवीन खरेदीदारांची संख्या वाढविण्यात येणार आहे.

प्राथमिक स्वरूपात ई-व्यवहार धान्याच्या अडत बाजारात सकाळपासून आॅनलाईन-हर्राशीला सुरुवात. प्राथमिक स्वरूपात बाजार समिती अंतर्गत शेतीमालाची खरेदी-विक्री होणार. खरेदीदारांची मक्तेदारी मोडण्यासाठी नवीन खरेदीदारांनाही परवाने देणार. ‘ई-नाम’ची अट मान्य करणार्‍या अडत्या-खरेदीदारांचे परवाने नूतनीकरण करणार. 

आॅनलाईन हर्राशी करण्यात अडचणीलिज्ड लाईन कृउबापर्यंत पोहोचली आहे. पण शासनाने नेमलेल्या कंपनीने कंपोनंटचा पुरवठा केला नाही. यामुळे ई-नामचे काम रखडले. बाजार समिती आता  डोंगल वापरून आॅनलाईन हर्राशी सुरू करणार, पण ई-नाम पोर्टलवर स्पीड भेटत नाही. दैनंदिन आलेल्या शेतमालाची मॅन्युअली गुणवत्ता तपासणीसाठी वेळ लागणार.