शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत ‘आयटीआय’च्या ‘इलेक्ट्रिशिअन’ ट्रेडला सर्वाधिक पसंती; २१ जागेसाठी आले १२ हजार ३३१ प्रवेशअर्ज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 12:28 IST

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) वीजतंत्री (इलेक्ट्रिशिअन) ट्रेडकडे विद्यार्थ्यांचा प्रचंड ओढा असून अवघ्या २१ जागांसाठी १२ हजार ३३१ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली.

ठळक मुद्देमराठवाड्यात आयटीआयची ८२ शासकीय आणि ३६ खाजगी महाविद्यालये आहेत. खाजगी आयटीआयमध्ये यावर्षी प्रवेशासाठी १८ हजार १३९ जागा उपलब्ध आहेत.

औरंगाबाद : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) वीजतंत्री (इलेक्ट्रिशिअन) ट्रेडकडे विद्यार्थ्यांचा प्रचंड ओढा असून अवघ्या २१ जागांसाठी १२ हजार ३३१ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली. प्रवेशाच्या पहिल्या फेरीमध्ये या ट्रेडची गुणवत्ता यादी ९४.५ टक्क्यांवर पोहोचली.

मराठवाड्यात आयटीआयची ८२ शासकीय आणि ३६ खाजगी महाविद्यालये आहेत. त्यात एकूण ५५ ट्रेड आहेत. मराठवाड्यातील शासकीय आणि खाजगी आयटीआयमध्ये यावर्षी प्रवेशासाठी १८ हजार १३९ जागा उपलब्ध आहेत. यासाठी तब्बल ५६ हजार १३९ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. या नोंदणीनंतर  पहिली प्रवेश यादी मंगळवारी (दि.१०) जाहीर झाली. पहिल्या फेरीत १४ हजार २०२ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आल्याची माहिती विभागीय सहसंचालक डी.आर. शिंपले यांनी दिली. मराठवाड्यातील सर्वांत जुने आणि मोठे आयटीआय महाविद्यालय असलेल्या औरंगाबादेत प्रवेशासाठी सर्वाधिक स्पर्धा आहे. तारतंत्रीसाठी ८,११०, यांत्रिक डिझेल ७,३१४, यांत्रिक मोटारगाडी ४,४१८, जोडारी (वेल्डर) ६,९२४, कातारी २,८२२, यंत्र कारागीर ३,०२२, मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स ४,८२३ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. या सर्व ट्रेडला ५० पेक्षा कमी जागा उपलब्ध आहेत.

तात्काळ नोकरी मिळतेवीजतंत्री, तारतंत्री, यांत्रिक डिझेल, यांत्रिक मोटारगाडी, जोडारी (वेल्डर), कातारीसह इतर ट्रेडच्या प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांना तात्काळ नोकरी मिळते. यातून अनेकांना स्वत:चा व्यवसायही सुरू करता येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा दहावी झाल्यानंतर या अभ्यासक्रमाकडे सर्वाधिक ओढा असतो.- सलीम शेख, उपप्राचार्य, शासकीय आयटीआय, औरंगाबाद