शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

‘मराठी’साठी इंग्रजी शाळा बंद करणे चुकीचे

By admin | Updated: November 30, 2014 00:56 IST

लातूर : मराठी भाषा टिकविण्यासाठी इंग्रजी शाळा बंद करायला हव्यात. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचे हे वक्तव्य साहित्यकांचा वादविवाद आहे़

लातूर : मराठी भाषा टिकविण्यासाठी इंग्रजी शाळा बंद करायला हव्यात. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचे हे वक्तव्य साहित्यकांचा वादविवाद आहे़ इंग्रजी शाळा बंद करून मराठी टिकेल हे म्हणणे चुकीचे आहे़ मुलांचे करिअर आणि रोजगाराच्या संधी पाहता मराठीसह इंग्रजीशिवाय गत्यंतर नाही, असे ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणातून पुढे आले आहे़ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या भाषणात इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद करा, मुलांना मातृभाषेतच स्वप्न पडायला हवीत, असे रोखठोक मत व्यक्त करून नव्या वादाला तोंड फोडले आहे़ या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने शहरातील नागरिकांचे सर्व्हेक्षणातून मत जाणून घेतले आहे़ आजच्या युगात इंग्रजी शिक्षण महत्वाचे असून इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद करण्याची मागणी करणे चुकीचे आहे़ मराठी भाषा टिकली पाहिजे़ परंतू इंग्रजीच्या शाळा बंद करून हे शक्य होणार नाही़ स्पर्धेच्या युगात मराठी शाळांनी आपली गुणवत्ता जोपासली पाहिजे़ शिवाय, इंग्रजी शाळांच्या बरोबरीने मराठीबरोबरच इंग्रजी शिक्षणावर भर द्यायला हवा, असे मत व्यक्त करण्यात आले आहे़ मराठीसाठी इंग्रजी शाळा बंद करणे या निर्णयाने मराठी वाढेल काय यावर शंभर नागरिकांची मते जाणून घेण्यात आली़ यापैकी ७३ नागरिकांनी इंग्रजी शाळा बंद करण्याचा निर्णय घेणे चुकीचे असल्याचे मत नोंदविले़ तर २७ नागरिकांनी मराठी टिकविण्यासाठी शासनाने हा निर्णय घ्यायला हवी, असे सांगितले़ इंग्रजी शाळांच्या अतिक्रमणामुळे मराठी व मराठी शाळा नामशेष होत आहेत का? या प्रश्नावर ५४ टक्के नागरिकांनी होकार दर्शविला तर २३ टक्के लोकांनी नकार दर्शविला असून २३ टक्के नागरिकांनी काही प्रमाणात म्हणून उत्तर नोंदविले आहे़ आपला मुलगा कोणत्या शाळेत शिकतो वा शिकावा असे आपणास वाटते? या प्रश्नावर ५१ टक्के नागरिकांनी मराठीला पसंती दिली असली तरी ४९ टक््के लोक आता इंग्रजीची कास धरल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत आहेत़ कोणत्या शाळेतून मुलांचे करिअर व्यवस्थित होईल, असे वाटते ? या प्रश्नावर ४९ टक्के पालक इंग्रजीतून करिअर करता येते़ विविध बँका, शासकीय कार्यालये, खाजगी व निमशासकीय कार्यालयात इंग्रजीतच सर्वप्रकारचे अर्ज व नवीन जीआर निघत असल्याने इंग्रजीचा अभ्यास गरजेचा आहे़ एकीकडे मराठी टिकविण्यासाठी चर्चा होत असताना दुसरीकडे मात्र राज्य शासनाचा बहुतांश कारभारच इंग्रजीतून चालत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे़ ५१ टक्के पालक मराठीतूनही करिअर होते, त्यासाठी मराठी गरजेची आहे, मत व्यक्त करीत आहेत़ मराठी वाचवा ही हाक कशासाठी वाटते? यावर ४५ टक्के पालक म्हणतात मराठी जगविण्यासाठी हा निर्णय योग्य आहे़ राजकीय खुर्च्या टिकविण्यासाठी मराठी भाषेचा कांगावा केला जात असल्याचे ३९ टक्के नागरिकांचे मत आहे़ तर १६ टक्के पालकांनी हा साहित्यकांचा वादविवाद असल्याचे मत नोंदविले आहे़