शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उदघाटन झाले,पण कुलूप निघेना

By admin | Updated: June 29, 2014 00:37 IST

शिरूर अनंतपाळ : लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या येथील मुख्य रस्त्यावरील पोलिस चौकीचे गेल्या सहा महिन्यापासून कुलूपच निघाले नसल्याने ही चौकी केवळ नाममात्रच ठरत आहे़

शिरूर अनंतपाळ : लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या येथील मुख्य रस्त्यावरील पोलिस चौकीचे गेल्या सहा महिन्यापासून कुलूपच निघाले नसल्याने ही चौकी केवळ नाममात्रच ठरत आहे़ शिरूर अनंतपाळच्या मुख्य रस्त्यास राज्य मार्गाचा दर्जा मिळाल्याने आणि अतिक्रमण हटावची मोहिम धडकपणे राबविण्यात आल्याने येथील उदगीर रस्त्यावर मोठा चौक सहा महिण्यांपूर्वी निर्माण झाला़ या मोकळया चौकाला नाव देण्यासाठी अनेक सामाजिक संघटनाही सरसावल्या़ परंतु, गावातील ज्येष्ठ नागरिकांनी चौकाऐवजी पोलिस चौकी निर्माण केल्यास अधिक फायदेशीर ठरेल, अशी कल्पना सुचविली़ पोलिस चौकीमुळे वाहतुकीचे नियंत्रण होईल़ रहदारी सुरळीत होईल, त्याचबरोबर गावात नेहमी शांतता रहावी म्हणून पोलिसांना बसण्यास निश्चित ठिकाण होईल, अशी या कल्पनेमागील भावना होती़ त्यानुसार लोकसहभागातून हजारो रूपये निधी गोळा करून पोलिस चौकी सहा महिन्यांपूर्वी उभारण्यात आली़ विशेष म्हणजे चौकीत बसण्यासाठी टेबल, खुर्चीची व्यवस्थाही करण्यात आली़ या पोलिस चौकीचे रितसर पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले़ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्वतंत्र चौकीदार नियुक्त करण्यात येईल, अशी घोषणाही केली़ उद्घाटनानंतर मात्र ही घोषणा हवेतच विरली़ सहा महिन्यांपासून पोलिस ठाण्याकडून चौकीदार नियुक्त करण्यात आला नसल्याने पोलिस चौकी कुलूपबंद आहे़ (वार्ताहर)चौकीदार देण्यात येईल़़़शिरूर अनंतपाळ येथे उभारण्यात आलेल्या पोलिस चौकीसाठी एका पोलिस कर्मचाऱ्याची नियुक्ती लवकरच करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक बंडोपंत मुंडे यांनी सांगितले़या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी पोलिसांनी चोख भूमिका बजावली होती़ परंतु, आता ही चौकीच अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे़ पोलिसही उघड्या डोळ्यांनी त्याकडे पाहत आहेत़ चौकीदार नसल्याने गावात पुन्हा रहदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे़ सध्या मुख्य रस्त्याचे काम सुरु असल्याने एकीरी वाहतूक सुरु आहे़ त्यामुळे पोलिस चौकी सुरु करावी, अशी मागणी होत आहे़