मालेगाव : पोळा अन् सण झाले गोळा़़़ असे पोळ्याच्या सणाबाबत म्हटले जाते़ या दिवशी बैलाची शेतकऱ्यांकडून पूजा केली जाते़ गावातून मोठ्याने थाटाने झुले लावून गावप्रदक्षिणा घातली जाते़ परंतु यावर्षी पावसाने दगा दिल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला असून यंदाचा पोळा मात्र मालेगावात म्हणावा तेवढा उत्साहाने साजरा झाला नसल्याने जणू पोळ्यावर दुष्काळाचे सावट पडले आहे़ तिथीनुसार २५ आॅगस्ट रोजी पोळा असून मात्र सोमवारी पोळा साजरा न करता मालेगाव येथील आदल्या दिवशी साजरा केला़ सद्यस्थितीत पाऊस न पडल्याो सोयाबीन, कापूस यासारखी पिके वाळून जात आहेत़ शिवाजी जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला़ याबाबत तुकाराम इंगोले या शेतकऱ्याने सांगितले की दरवर्षी आम्ही पोळा मोठ्या उत्साहाने साजरा करीत होतो़ यंदा मात्र पावसामुळे यावर्षीच्या पोळा साजरा करण्यासाठी तेवढा आनंद उरला नाही़ (वार्ताहर)
आदल्या दिवशीच साजरा झाला पोळा
By admin | Updated: August 24, 2014 23:48 IST