शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्ग होऊ नये ही मागणी नाही- उद्धव ठाकरे

By admin | Updated: June 26, 2017 12:58 IST

समृद्धी महामार्ग होऊ नये ही मागणी नाही, पण शेतकऱ्यांची काय मागणी आहे हे समजून घ्यावं लागेल.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 26-  समृद्धी महामार्ग होऊ नये ही मागणी नाही, पण शेतकऱ्यांची काय मागणी आहे हे समजून घ्यावं लागेल. काही शेतकरी जमीन न देण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. तर काही शेतकरी त्यांच्या जमिनी देणार आहेत. या महामार्गासाठी सुपीक जमीनी जात आहे. त्यामुळे याबाबत अभ्यास करण्यासाठी मुंबईला बैठक घेतली जाईल, असं शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगितलं आहे. समृद्धी महामार्ग विरोधात शेतकऱ्यांशी चर्चा करणार त्याचा अभ्यास करणार,  महामार्गाचे टेंडर निघत आहे, भूसंपादन रक्कम देण्यासाठी अंतिम मसूदा तयार आहे. हे थांबविण्याबाबत सध्या तरी काही निर्णय नाही. पण मंत्री एकनाथ शिंदे व महामार्ग बाधित शेतकरी यांच्यात बैठक घेणार असल्याचं पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगितलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महामार्ग बाधित शेतकरींशी पळशी व माळीवाडा येथे संवाद साधला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे  २५ जूनपासून नाशिक आणि नगरच्या दौऱ्यावर आहेत. 
दरम्यान आज सकाळी उद्धव ठाकरे  यांनी औरंगाबादमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याचं मोजून घेणार, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सरकारला दिला. तसेच वेळप्रसंगी शिवसेना समृद्धी महामार्ग विरोधात आंदोलन करील असा इशाराही त्यांनी दिला. कर्जमाफी ही फॅशन आहे, भाव दिला तरी रडतात साले, मोबाईल बिल भरण्यासाठी पैसे असतात पण कर्ज फेडायला तयार नसतात. असं म्हणून शेतकऱ्यांची हेटाळणी करणाऱ्यांना झुकविले आणि कर्जमाफी करायला लावली, असंही ते म्हणाले आहेत. 
तसंच नगर, नाशिकमधील शेतकरी अद्यापही त्रस्त आहेत त्याबाबत अभ्यासगट स्थापन करण्याच्या सरकारला सूचना देणार असल्याचं उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. तसंच कर्जमाफीच्या आंदोलनात ज्या प्रमाणे शिवसेना कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला त्याच प्रकारे प्रत्येकाने आपापल्या गावातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीची माहिती उपलब्ध करून द्यावी, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.  शेतकरी आणि शिवसेना एकत्र आल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी शक्य झाली.  शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी उभी राहिली आणि यापुढेसुद्धा राहिलं. शिवसेनेकडून शेतकऱ्यांच्या सूचनांचा आणि मागण्यांचा पाठपुरावा शिवसेना करणार आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे.  
 कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं पण या आंदोलनादरम्यान पुणतांब्यातील ज्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते तातडीने मागे घ्या, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. तसंच  नियमितपणे कर्ज परत फेडणाऱ्या शेतकऱ्यांना जी मदत मिळणार आहे त्या मदतीत वाढ केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शिवसेनेच्या पाठीशी शेतकरी आहेत त्यामुळे कर्जमुक्तीला फॅशन म्हणणाऱ्यांना कर्जमाफी करावीच लागली, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांना टोला लगावला आहे. जून 2016 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज राज्य सरकारने माफ केलं आहे पण आता जून 2017 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आहे त्यांचं कर्ज माफ करावं, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
औरंगाबादमधील संवाद यात्रेनंतर 29 जूनपासून उद्धव ठाकरे मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या सूचनांची आणि मागण्यांची माहिती घेतली जाणार आहे.