बीड : क्लासेस लावून लाखो रूपये खर्च करण्यापेक्षा घरबसल्या अभ्यास करूनही यश मिळवू शकतो, हे शेतकऱ्याच्या मुलीने दाखवून दिले आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत ‘तिने’ राज्यातून सहावा क्रमांक मिळवून बीडचे नाव उज्ज्वल केले आहे.पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा या खेडे गावापासून शिक्षणाला सुरूवात केलेल्या वर्षाराणी केशव भोसले हिने उपजिल्हाधिकारी पदापर्यंत कधी मजल मारली हे समजलेच नाही. पारगाव जि.प.शाळेत प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर गढीच्या नवोदय विद्यालयात माध्यमिक, उच्च शिक्षण लातूरच्या शाहू महाविद्यालयात तर इंजिनिअरिंग पुण्याला केले. एवढे करत असताना आत्मविश्वास कधीच कमी होऊ दिला नाही. प्रत्येक परीक्षेत ९० टक्यापेक्षा अधिक गुण घेऊन वर्षाराणी अग्रेसर राहिली.सहावीच्या वर्गात असताना तिला शिक्षणासाठी घर सोडावे लागले. आई-वडीलांशिवाय राहणे तिला खूप कठीण जात होते. सुरूवातीचे सहा महिने अभ्यासात मन नाही लागले. परंतु आई-वडीलांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवायचाच हे तिने मनोमन ठरवले.घरी असताना चुलते मंचक भोसले हे नेहमी अभ्यास करताना दिसायचे. आपणही त्यांच्यासारखा अभ्यास करून अधिकारी व्हावे, असा निर्णय घेतला. त्यामुळे वर्तमानपत्रांसह पुस्तकांचे वाचन वाढविले. याचा फायदा स्पर्धा परीक्षेची तयारी करताना झाला, असे वर्षाराणीने सांगितले.‘युपीएससी’ची तयारी सुरूएसटीआयची परीक्षा दिली. यामध्ये माझी निवड झाली होती. तसेच २०१२ ला पूर्व परीक्षेच्या परीक्षेत अपयश आले. तरीही मी जिद्द हरले नाही. त्यानंतर परीक्षा दिली आणि यश मिळविले. यापुढेही ‘युपीएससी’ची परीक्षा चालू ठेवणार असून मला आयएएस आॅफिसर बनायचे आहे, त्या दृष्टीकोणातून माझा अभ्यासही सुरू असल्याचे वर्षाराणी भोसले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)दिवसातून दहा ते बारा तास अभ्यास घरबसल्या करायचे. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना नातेवाईक आणि मित्र-मैत्रीणींचे सहकार्य हे मनोबल वाढविणारे ठरले. त्यामुळेच मी ४१० गुण घेऊन हे यश संपादन केले. सण-उत्सव, घरचे कार्यक्रमही मी अभ्यासापुढे विसरले होते, असे वर्षाराणीने सांगितले.४मुलींची जिद्द पूर्ण होऊ द्या. आजही आम्हा मुलींमध्ये शिक्षणाची जिद्द आहे. आमच्या अंगी असलेली जिद्द पूर्ण होईपर्यंत त्यांना आई-वडीलांनी सहकार्य करावे. आम्ही मुलीही तुमच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही, मुलींनीही विश्वास साध्य करून यश मिळवावे, असा संदेश वर्षाराणीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलींना आणि त्यांच्या आई-वडीलांना दिला.
क्लासेसचा आधार न घेता ‘ती’ झाली उपजिल्हाधिकारी
By admin | Updated: April 7, 2015 01:23 IST