शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
2
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
3
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
4
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
5
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
6
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
7
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
8
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
9
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
10
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
11
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
12
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
13
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
14
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
15
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
16
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
17
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
19
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
20
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

जमिनी सांभाळणे हेच मोठे आव्हान

By admin | Updated: July 15, 2015 00:40 IST

औरंगाबाद : क्षेत्रफळाने महाराष्ट्रात सर्वांत मोठी बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सोमवारी पार पडली.

औरंगाबाद : क्षेत्रफळाने महाराष्ट्रात सर्वांत मोठी बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सोमवारी पार पडली. १८ जणांचे नवीन संचालक मंडळ निवडून आले. त्यांच्या समोर बाजार समितीची ७३ हे. २८ आर एवढी जमीन सांभाळणे, अतिक्रमणापासून वाचविणे, न्यायालयीन वादात अडकलेल्या २० हे. ८३ आर जमिनी मिळविण्यासाठी प्रयत्न करणे आणि ज्यामुळे बाजार समितीची विकासकामे रखडली आहेत तो मास्टर प्लॅन महानगरपालिकेकडून मंजूर करून घेणे हे मोठे आव्हान असणार आहे. यासाठी संचालक मंडळाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. बाजार समितीवर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे पुरस्कृत ‘सहकारी संस्था विकास पॅनल’ असो की, माजी आ. कल्याण काळे पुरस्कृत ‘शेतकरी सहकारी विकास पॅनल’ कोणाचाही सभापती झाला तरीही त्यांच्यासमोर बाजार समितीची जमीन सांभाळणे हे मोठे आव्हान असणार आहे. ११ हे. ५९ आर जमीन अजूनही बाजार समितीच्या ताब्यात मिळाली नाही. या जाधववाडी व हर्सूल येथील जमिनीचा वाद न्यायालयात सुरू आहे. या जमिनी मिळवून घेण्यासाठी सभापती व संचालकांना सर्वाधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. २००९ मध्ये बाजार समितीचा मास्टर प्लॅन तयार झाला. मात्र, ६ वर्षे झाली; पण अजूनही त्यास महानगरपालिकेने मंजुरी दिली नाही. प्रत्यक्षात कोणत्याही मास्टर प्लॅनला ६ महिन्यांचा आत मंजुरी देणे अपेक्षित होते; पण मनपाने मंजुरी न दिल्याने अखेर बाजार समितीने मनपाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. मास्टर प्लॅनला मंजुरी न मिळाल्याने बाजार समिती परिसरातील विकासकामांवर मोठा परिणाम झाला आहे. महानगरपालिकेकडून मास्टर प्लॅन मंजूर करून घेण्यासाठी नवीन सभापती व संचालकांकडे राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. अखेर कोणाच्या पॅनलचा सभापती होतो, यावर बाजार समितीच्या विकासाची दिशा ठरणार आहे. मोंढा स्थलांतरावरही निर्णय घ्यावा लागणारनवीन सभापती व संचालक मंडळाला ‘राजकारण’ बाजूला ठेवून मोंढा स्थलांतराचा प्रश्न सोडवावा लागणार आहे. मागील १७ वर्षांपासून हा विषय अनेकदा ऐरणीवर आला; पण स्थलांतर झाले नाही. पुणे येथील कृषी पणन मंडळाने दिलेल्या सूचनेनुसार बाजार समितीने पाच वर्षांचा विकास आराखडा तयार केला आहे. त्यानुसारच नवीन संचालक मंडळाला बाजार समितीत विकास करावा लागणार आहे. २०१३-२०१४ मध्ये विकास आराखडा तयार करण्यात आला; पण त्यातील अनेक प्रस्तावांना अजूनही मंजुरी मिळाली नाही. बाजार समितीकडे २०१८ पर्यंतचा विकास आराखडा तयार आहे. प्रस्ताव मंजूर करून तो योग्य पद्धतीने राबविण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती वापरावी लागणार आहे.बाजार समितीच्या २२ याचिका सध्या वेगवेगळ्या न्यायालयांत प्रलंबित आहेत. यात बाजार समितीच्या मालमत्तेबाबत, गाळे, जागा संपादनाबाबत तसेच मास्टर प्लॅनला मंजुरी मिळण्याबाबतच्या याचिका आहेत. २०१३-२०१४ मध्ये ६६ याचिका न्यायालयात दाखल होत्या. न्यायालयात सर्वाधिक याचिका दाखल असणारी बाजार समिती म्हणूनही जाधववाडीतील बाजार समितीचा उल्लेख केला जात असे. मात्र, मागील वर्षभरात अनेक याचिका निकाली निघाल्या आहेत.