शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

महामार्गावरील अपघाताचा मुद्दा आला ऐरणीवर

By admin | Updated: July 28, 2016 00:51 IST

समिर सुतके , उमरगा ‘तीन वर्षांच्या कालावधीत महामार्गावर अपघातात १३० जणांचा मृत्यू ’ या ‘लोकमत’च्या वृत्ताचे पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले.

समिर सुतके , उमरगा‘तीन वर्षांच्या कालावधीत महामार्गावर अपघातात १३० जणांचा मृत्यू ’ या ‘लोकमत’च्या वृत्ताचे पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले. आ. ज्ञानराज चौगुले यांनी औचित्याचा मुद्दा म्हणून अपघाताचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी संबंधित विभागाला आता चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामपूर पाटी ते तलमोडजवळील कर्नाटक सीमेपर्यंत या ३० किमी अंतरावर २०१२-१३ ते २०१६ या तीन वर्षांच्या कालावधीत महामार्गावर झालेल्या अपघातात १३० जण मृत्यूमुखी पडले असून हजारो जखमी झालेले आहेत. याकडे लक्ष वेधत ‘लोकमत’ने या महामार्गाच्या दयनयीय अवस्थेकडेही लक्ष वेधले होते. महामार्गावरील दिशादर्शक फलकांची दुरवस्था झाली आहे. साईडपट्ट्या गायब असून, गतिरोधक नसल्याने गाडीचालकांचे वेगावर नियंत्रण रहात नाही. त्यामुळे या मार्गावर दररोज अपघात होत असल्याचे व त्याकडे महामार्गाशी संबंधित विभागाकडून कानाडोळा केला जात असल्याचे वास्तव पुढे आणले होते. अपघातामुळे निष्पाप लोकांचा बळी जातोय, तर जखमींना कायमचे अपंगत्व येते आहे. महामार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी महामार्ग रस्ते विकास विभाग व इतर संबंधित विभागाची कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही. तलमोड ते कराळी पाटी येथील वळणावर गाडी चालविताना पुढून येणारे वाहन दिसत नाही तसेच वेगही समजत नाही. याच भागात सगळ्यात जास्त अपघात घडत असतात. या महामार्गाच्या लगतच नवीन महामार्गाचे चौपदीरकरणाचे काम चालू आहे. रस्त्याच्या कडेलाच नवीन रस्त्यासाठी खोलीकरण केले जात आहे. येथे कसलेही सूचना फलक अथवा सुरक्षाकडे नाही. खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात होत असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले होते. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित झाल्यापासून आतापर्यंत तब्बल सात अपघात होऊन तेथे चार-पाच जणांचा बळी गेला आहे. तर ३० जण जखमी झाले आहेत. आ. ज्ञानराज चौगुले यांनी या वृत्ताची गंभिरपणे दखल घेत सदर मुद्दा मंगळवारी विधानसभेत उपस्थित केला. तसेच प्रधान सचिवांना याबाबत उपाययोजनां करण्याबाबत पत्र दिले. विधानसभेत मुद्दा उपस्थित झाल्यानंतर संबंधित विभागाकडून याबाबतची संपुर्ण माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचेही आ. चौगुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.