बलसूर : उमरगा तालुक्यातील बलसूर येथील एका ४५ वर्षीय इसमाने रविवारी रात्री राहत्या घरी छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली़ मिळालेल्या माहितीनुसार, बलसूर येथील शेतकरी त्र्यंबक भिमराव वाघमाडे (वय-४५) यांनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरी स्लॅबच्या अँगलला दोरी बांधून गळफास घेवून आत्महत्या केली़ घटनास्थळी नायब तहसीलदार जोशी, मंडळ अधिकारी व्ही़ए़पाटील, तलाठी एस़व्हीक़ोकाटे यांनी भेट देवून पंचनामा केला़ याबाबत सुधाकर वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीवरून उमरगा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तपास पोना सूर्यवंशी हे करीत आहेत़ दरम्यान, मागील दोन-तीन वर्षापासून सतत नापिकी होत आहे़ त्यामुळे पाच एकर अठरा गुंठे शेतातून अपेक्षित उत्पन्न हाती पडत नसल्याने नैराश्येपोटी त्र्यंब वाघमोडे यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले़ त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे़ (वार्ताहर)
बलसूर येथील इसमाची आत्महत्या
By admin | Updated: March 17, 2015 00:41 IST