नळदुर्ग : मुंबई येथील बेलापूर भागात राहणाऱ्या ५५ वर्षीय इसमाने लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील शिरगापूर शिवारात बुधवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुंबई येथील खंडू मार्तंड वाघमारे हे ट्रकचालक असून, मंगळवारी रात्री ईटकळ येथे ट्रक लावून ते शिरगापूर येथे त्यांची बहीण सोनाबाई अभिमान गायकवाड यांच्याकडे मुक्कामी आले होते. बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास मुंबईला जातो असे सांगून ते बहिणीच्या घरातून बाहेर पडले व शिरगापूर शिवारातील संगमेश्वर पाटील यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत सोनाबाई गायकवाड यांनी दिलेल्या माहितीवरुन नळदुर्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हेकॉ सातपुते करीत आहेत. (वार्ताहर)
मुंबईतील इसमाची आत्महत्या
By admin | Updated: July 14, 2016 01:02 IST