नांदेड : १८ मे २०१४ च्या शासनपरिपत्रकाची अंमलबजावणी करावी, धनगर, हटकर या जातींचा अनु.जमातीत समावेश करु नये, या मागणीसाठी हदगाव तहसीलकार्यालयावर मुळ आदिवासीेंनी गुरुवारी मोठा मोर्चा काढला तर लोहा, मुखेड, अर्धापूर, नायगाव, उमरी, नरसी, मालेगाव आदी ठिकाणी धनगर समाजाने विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. नरसीफाटानसरीफाटा : राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या आवाहनावरून आरक्षणाच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नायगाव तालुका धनगर समाज आरक्षण हक्क समितीच्या वतीने १४ आॅगस्ट रोजी नरसी चौकात रास्ता रोको करण्यात आले़ नायगाव तालुक्यातील संपूर्ण समाजबांधव रास्ता रोकोत सहभागी झाला होता़ चौकातील चारही महामार्गावर तब्बल तासभर चाललेल्या या रास्ता रोकोमुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ समितीचे माणिक लोहगावे, बालाजी चोंडे, सूर्याजी चाडकर, शिवाजी होळकर, गंगाधर पाटील, गोविंद तुप्पेकर, दिगंबर पिंपळे, त्र्यंबक डाके, खनपट्टे यांनी न्याय हक्काच्या मागण्यांचे तलाठी विजय जाधव यांनी निवेदन स्वीकारले़ रामतीर्थचे सपोनि जगताप व त्यांच्या सहकार्यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता़उमरीउमरी : तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला़ उमरी-कारेगाव रस्त्यावर आज सकाळी शेळ्या मेंढ्यासह येळकोट़़़ येळकोट जय मल्हारच्या घोषणा देत धनगर समाजाचे शेकडो कार्यकर्ते आले़ रस्त्यावरच भजन, गीतगायन करीत बसल्याने यावेळी नरसी, धर्माबाद जाणारी अनेक वाहने थांबली़ या रास्ता रोकोमध्ये धनगर समाजाचे तालुकाध्यक्ष कोमराजी उर्फ शाहीर जेंटल, उपाध्यक्ष गणपत शिगळे, सचिव देवीदास मुंडफळे, बालाजी लोहगावे, गोळेगावचे उपसरपंच गोविंद सुरणे, बाबू मलू, शिवाजी सुरणे, पांडुरंग सांगवे, ज्ञानेश्वर लोहगावे, मलू सुरणे, दत्ता शेट्टे, तोलबा गुंटे, मारोती मॅकले, नागोराव शिगळे, मारोती शिगळे, दत्ता शिगळे, विठ्ठल शिगळे, मोहन संबोड, माणिक संबोड आदी समाज बांधव सहभागी झाले होते़ पोलिस निरीक्षक एम़ ए़ इनामदार यांनी यावेळी बंदोबस्त ठेवला होता़ लोहालोहा : येथील धनगर समाजाच्या वतीने आयोजित रास्तारोको आंदोलनामुळे नांदेड-लातूर- गंगाखेड व कंधार मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी माजी जि. प. सदस्य बालाजी वैजाळे, रासपाचे रामचंद्र येईलवाड, भगवानराव हाके, परशूराम वडजे, गोविनद केंद्रे, गोविंद ठेपे, हनुमंत धुळगुंडे आदींनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनात मारोती जंगले, कोरे, दशरथ बुडगुळे, मारोती बुडगुळे, आनंद गुंठे, चंद्रकांत गुंठे, राम डेरे आदींचीेही उपस्थिती होती. अर्धापूरअर्धापूर : येथील बसवेश्वर चौकात धनगर समाजाच्ळा वतीने रास्ता रोको करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार बोथीकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात संभाजीराव धुळगंडे, मारोतराव कानोडे, नवनाथ बारसे, व्यंकट मोकले, बालाजी कल्याणकर, गंगाधरराव नेवरकर, बबनराव बासरे, प्रल्हाद इंगोले, गोविंद शिनगारे, बाबूराव लंगडे, डॉ. शाम पवार आदी सहभागी झाले होते. मुखेडमुखेड : शहरातील लातूरनाका, बाऱ्हाळीनाका येथे धनगर समाजाच्या वतीने रास्तारोको करण्यात आला. आंदोलनामुळे ४ तास वाहतूक ठप्प झाली होती. सामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते. आंदोलनात धनगर समाज कृती समितीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मंडलापूरकर, सचिव शिवाजी कोनापुरे, कार्याध्यक्ष व्यंकटराव दबडे, उपाध्यक्ष जगन्नाथ कामजे, कल्याण पाटील, डी.एस. गोपनर, मधुकर सादरगीर, ईश्वर खांडेकर, काशीनाथ येवते, शंकरअण्णा परसे, राजू कोनापुरे, गणपत कोनापूरे, दीपक कोनापूरे, कृष्णा कामजे, पप्पू वाडीकर, सरपंच विजय गोपनर, बालाजी जुबरे, पांडुरंग गोपनर आदी सहभागी झाले होते. पो.नि. संदीपान शेळके, फौजदार इंद्राळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. मुदखेडला रेल रोको आंदोलनमुदखेड : बंजारा समाजाला एस.टी. प्रवर्गाच्या सवलती लागू कराव्यात, वसंतराव नाईकांचा बंदीस्त पुतळा मुक्त करुन नांदेड येथील नियोजित जागेवर त्वरीत बसविण्यात यावा आदी मागण्यांसाठी १४ आॅगस्ट रोजी मुदखेड येथे रेल रोको आंदोलन करण्यात आले. नांदेड ते सांत्रागच्छी, कोल्हापूर ते धनबाद आणि पूर्णा ते पडणा रेल्वे भोकर येथे थांबवावी ही मागणीदेखील करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व डॉ. मोहन चव्हाण चिदगिरीकर यांनी केले. आंदोलनात प्रा. साहेबराव चव्हाण (जि.अ.बहुजन मुक्ती पार्टी), प्रविण चव्हाण, शोभाराणी चव्हाण, नारायणसिंग राठोड यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदविला. मूळ आदिवासींचा हदगावला मोर्चाहदगाव : धनगर व हटकर या जातीचा आदिवासी जमाती अनुसूचित समाविष्ट करू नये, १८ मे २०१३ महाराष्ट्र शासन परिपत्रकाची अंमलबजावणी करणे या मुख्य दोन मागण्यांसाठी वेगवेगळ्या संघटनेमार्फत हदगाव तहसीलवर धडक मोर्चा काढण्यात आला़मोर्चा आदिवासी युवक कल्याण संघ हदगाव, अखिल भारतीय विद्यार्थी विकास परिषद दिल्ली, आदिवासी बचाव आंदोलन नांदेड, आदिवासी सरपंच संघटना हदगाव या संघटनेमार्फत सकाळी ११ वाजता आदिवासी मुलांच्या वसतिगृहापासून निघाला़ उपविभागीय कार्यालय हदगावचे अधिकारी दीपक घाडगे यांना मागणीचे निवेदन माजी आ़ भीमराव केराम यांच्या हस्ते देण्यात आला़ त्यानंतर हा मोर्चा तहसील कार्यालयाकडे वळला व मोर्चाचे सभेत रुपांतर झाले़ सभेमध्ये नेत्यांनी शासनाच्या विरोधात आपआपली मते व्यक्त केली़ उपस्थितांना प्रा़ माधव सरकुटे (यवतमाळ), माजी आ़ भीमराव केराम, सतीष पाचपुते (हिंगोली), कांचन दासरवाड, राम मिराशे, डॉ़ बळीराम भुरके, भारत खुपसे, प्रकाश बोकरे, येळके आदींनी मार्गदर्शन केले़ मोर्चात आदिवासींनी परंपरागत उपजिविकेची साधने, शिकारीची साधने यात फासे, वाघूर, तिकमठा, जाळी इत्यादीसह सहभागी झाले होते़महिलांनी शिस्तीत मुलाबाळासह व शालेय विद्यार्थिनी सुद्धा दोन रांगाकरून सहभाग घेतला़ एका वाहनावर आदिवासींच्या गळ्यात दोरखंड बांधून धनगर, हटकर, बंजारा आदी जातीवर अन्याय करीत असल्याचा देखावा तयार केला होता़ तर आदिवासीच्या वेशभूषेतील अनेक लोक पारंपारिक नृत्य करीत होते़ प्रा़ माधव सरकुते, के़ व्ही़ मढावी, मधुकर पिचड, डॉ़ बळीराम भुरके, प्रा़ ढोले, माजी आ़ भीमराव केराम, राम मिरासे, सटवा डोखळे, किशनराव फोले, भारत खुपसे, मारोती बोरकर आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)
लोहा, मुखेड, अर्धापूर, नायगाव, उमरी, नरसीत धनगर समाजाचा रास्तारोको
By admin | Updated: August 15, 2014 00:05 IST