शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव मंत्रालयात इनवर्ड

By admin | Updated: November 18, 2015 00:38 IST

लातूर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता दिलेला आणि विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी शिफारस केलेल्या उजनी प्रकल्पातून

लातूर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता दिलेला आणि विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी शिफारस केलेल्या उजनी प्रकल्पातून पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव मंगळवारी मंत्रालयातील पाणीपुरवठा विभागात इनवर्ड करण्यात आला आहे़ लातूर मनपाच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी अशोक पिसाळ यांनी हा प्रस्ताव इनवर्ड केला आहे़ आता त्यावर प्रधान सचिवांची स्वाक्षरी झाल्यानंतर या योजनेच्या अंमलबजावणीला प्रारंभ होणार आहे़ उजनीहून लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी लातूर महापालिकेकडून ४३८२़४८ लाख रुपयांचा ढोबळ रकमेचा प्रस्ताव आता विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या शिफारशीनुसार राज्याच्या पाणीपुरवठा विभागात दाखल झाला आहे़ महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी अशोक पिसाळ यांच्या मार्फत हा प्रस्ताव विभागात इनवर्ड करण्यात आला आहे़ बुधवारी सकाळी ११ वाजता पिसाळ यांनी प्रस्ताव दाखल केला असून, आता या प्रस्तावाची संबंधित डेस्ककडून पडताळणी होणार आहे़ दरम्यान, बुधवारी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले मंत्रालयातच मिटींगच्या निमित्ताने उपस्थित होते़ जलयुक्त शिवार अभियानाच्या निमित्ताने मंत्रालयात बैठक होती़ त्या बैठकीला जिल्हाधिकारी गेले होते़ उजनीहून होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या अनुषंगाने मात्र या बैठकीत चर्चा झाली नसल्याचे समजते़ जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्याने या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता दिली आहे़ शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाल्यानतर या योजनेचे काम होणार आहे़ त्यासाठीच मनपाने खास माणूस पाठवून प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांच्या कार्यालयात सादर केला आहे़ परंतु, यावर अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही़ किमान दोन-तीन दिवसांचा कालावधी प्रशासकीय मान्यता मिळायला लागेल, असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले़ प्रशासकीय मान्यतेपूर्वीच उस्मानाबाद नगरपालिका तसेच रेल्वेची नाहरकत, सार्वजनिक बांधकाम विभागाची नाहरकत प्रमाणपत्र मिळाले असल्याचे समजते़ केवळ प्रशासकीय मान्यतेसाठी हा प्रस्ताव रेंगाळला आहे़ उस्मानाबाद जिल्ह्यातील हातोला ते शिराढोणपर्यंत पाईपलाईन आणि उजनी ते उस्मानाबाद पर्यंत तीन पंप बदलणे ही कामे या योजनेत आहेत़ ४३ कोटी रुपयांचा यावर खर्च अपेक्षित आहे़ मात्र सध्या तरी हा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी मंत्रालयात सादर झाला आहे़ (प्रतिनिधी)