शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात ३ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 23:37 IST

नवीन वर्ष मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वाचे आणि फायदेशीर ठरत असल्याचे दिसू लागले आहे. कालपर्यंत फक्त येणार म्हणून चर्चा होत असलेल्या कंपन्यांसोबत दिल्ली-मुंबई-इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत महामंडळाने सामंजस्य करार करण्याचा सपाटा सुरू केला आहे. ३ हजार पैकी १५०० कोटींच्या गुंतवणुकीचे करार झाले आहेत. सुमारे १५०० कोटींचे करार विविध उद्योगांसोबत होणार असल्यामुळे औरंगाबाद, जालना, बीड, लातूरमध्ये औद्योगिक उलाढालीसह रोजगार निर्मितीला चालना मिळणे शक्य होईल, असे वाटते आहे.

ठळक मुद्देडीएमआयसी, एमआयडीसी : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूरमध्ये उद्योगांना चालना

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नवीन वर्ष मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वाचे आणि फायदेशीर ठरत असल्याचे दिसू लागले आहे. कालपर्यंत फक्त येणार म्हणून चर्चा होत असलेल्या कंपन्यांसोबत दिल्ली-मुंबई-इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत महामंडळाने सामंजस्य करार करण्याचा सपाटा सुरू केला आहे. ३ हजार पैकी १५०० कोटींच्या गुंतवणुकीचे करार झाले आहेत. सुमारे १५०० कोटींचे करार विविध उद्योगांसोबत होणार असल्यामुळे औरंगाबाद, जालना, बीड, लातूरमध्ये औद्योगिक उलाढालीसह रोजगार निर्मितीला चालना मिळणे शक्य होईल, असे वाटते आहे.२५ देशांमध्ये युनानी औषधी निर्यात करणाºया हमदर्द लॅबोरेटरिज लिमिटेडचे औरंगाबादेतून लवकरच उत्पादन होणार आहे. दिल्लीनंतर चौथा प्रकल्प औरंगाबादेत सुरू करण्यात येणार असून, सुमारे ३ एकर जागा कंपनीला एमआयडीसीने दिली आहे. आॅक्टोबर २०१८ पासून त्या प्रकल्पात उत्पादन सुरू होण्याचा दावा करण्यात येत आहे. शेंद्रा औद्योगिक वसाहतीत ही कंपनी १६५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, यातून २०० जणांना येथे रोजगार मिळू शकेल. वाळूजमध्ये बाळकृष्ण इंडस्ट्रीजने १०० कोटींच्या गुंतवणुकीतून १५०० जणांना तर पॅरासॅन व्हेंचर्सतर्फे पैठणमध्ये ९५ कोटींसह ६०० जणांना रोजगार मिळेल एवढ्या गुंतवणुकीचा निर्णय घेतला आहे. जालना-अंबड औद्योगिक वसाहतीत तिसºया टप्प्यांत दोन स्टील कंपन्या प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहेत. तेथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणे शक्य होणार आहे. सिद्धीविनायक स्टील १३१ कोटी, यथार्थ स्टील २२ कोटी, तर शाश्वती पॉवर ही कंपनी जालन्यात १३०० कोटींची गुंतवणूक टप्प्याटप्प्याने करणार आहे. जालन्यात सर्व मिळून १४५१ कोटींची गुंतवणूक होण्याचा दावा केला जात आहे.प्रादेशिक अधिकाºयांचा दावाएमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ यांनी सांगितले, १५० उद्योगांसोबत आजवर करार झाले आहेत. डीएमआयसीमध्ये २५ करार झाले आहेत. हमदर्द, पॅरासन, बीकेटी, सीटीआर सोबतच जालन्यातील स्टील उद्योगांची मोठी गुंतवणूक होत आहे. ३१०० रोजगार निर्मितीचे हे प्रकल्प आहेत. २ लाख ४६ हजार चौ.मी. जागा या उद्योगांना दिली आहे. लातूरमध्ये १३९ हेक्टर जागा अतिरिक्त एमआयडीसीमध्ये रेल्वे कोच निर्मितीच्या उद्योगासाठी दिली आहे. १८ ते २३ फेबु्रवारीदरम्यान मुंबईत होणाºया मॅग्नेटिक महाराष्ट्र या इंटरनॅशनल उद्योग प्रदर्शनात डीएमआयसी, एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात उद्योग यावेत, यासाठी मार्केटिंग होणार आहे. त्याचा लाभ मराठवाड्याला होईल.