शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांची गुन्हे शाखेकडून कसून चौकशी

By admin | Updated: May 27, 2017 00:41 IST

जालना : नाफेड हमीभाव केंद्रावरील तूर विक्री प्रकरणात संशयित व्यापाऱ्यांचे जबाब नोंदविण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरुवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नाफेड हमीभाव केंद्रावरील तूर विक्री प्रकरणात संशयित व्यापाऱ्यांचे जबाब नोंदविण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरुवात केली आहे. दोन दिवसांत २१ व्यापाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे गुन्हे दाखल होण्याच्या भितीने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.जालन्यातील नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात साडेआठ हजार शेतकऱ्यांनी एक लाख ४२ हजार तीनशे क्विंटल तुरीची विक्री केली आहे. तुरीची आवक वाढल्याने २३ मार्चनंतर प्रती शेतकरी केवळ २५ क्विंटल तूर विक्रीची मर्यादा निश्चित करण्यात आली.दोन वेळा मुदतवाढ देऊन तुरीची आवक वाढतच गेल्यामुळे नाफेड केंद्राबाहेरील तुरीचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी आदेश दिले.पंचनाम्यात तुरीच्या तीन हजार पोत्यांचे मालक समोर आले नाहीत. त्यातच तुरीचे अठराशे पोते एकाच रात्रीतून गायब झाल्याने एकूण तूर खरेदीचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडला. त्यामुळे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. संशयित शेतकरी व व्यापारी अशा तब्बल ८४०० जणांची यादी तयार करण्यात आली आहे. पैकी शंभर क्विंटलपेक्षा अधिक तूर विक्री करणारे ८७९ शेतकरी, व्यापारी गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत.तसेच ज्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर तूर विक्री करून बँकेत शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेले पैसे, धनादेश व आरटीजीएसच्या माध्यमातून स्वत:च्या खात्यावर वळती केले, अशांंची कसून चौकशी केली जात आहे. गुरुवारी ११, तर शुक्रवारी दहा व्यापाऱ्यांना थेट मोंढ्यातून चौकशीकरिता गुन्हे शाखेत आणण्यात आल्याचे समजते.यामध्ये शहरातील काही प्रतिष्ठित व्यापाऱ्यांचाही समावेश आहे. चौकशीसाठी बोलावण्यात आलेल्या व्यापाऱ्यांचे जबाब नोंदविल्यानंतर आवश्यकता वाटल्यास पुन्हा हजर राहण्याच्या अटीवर त्यांना सोडण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तूर विक्री प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावावर तूर विक्री करणे अनेकांना महागात पडण्याची चिन्हे आहेत.