शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

Aurangabad Violence : विशेष तपास पथकाकडून चौकशीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 12:09 IST

शहरातील काही भागांत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक गठित करण्यात आले आहे.

औरंगाबाद : शहरातील काही भागांत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक गठित करण्यात आले आहे. या पथकाने कामाला सुरुवात केली असून, नागरिकांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आले आहे. दंगलीतील दोन जणांना अटक करून तीन दिवस पोलीस कोठडीत अधिकची विचारपूस केली जाणार आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक गठित केले आहे. या पथकात सहायक पोलीस आयुक्त सी. डी. शेवगण, पोलीस निरीक्षक सुरेश वानखेडे, नाथा जाधव, अविनाश आघाव, श्रीकांत नवले, सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, अजबसिंग जारवाल, विजय घोरडे, पोलीस उपनिरीक्षक हेमंत तोडकर, योगेश धोंडे यांचा समावेश राहणार आहे. पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, राहुल श्रीरामे हेही पथकाला सहकार्य करीत आहेत.

शुक्रवारी औरंगाबादेत किरकोळ कारणावरून दंगल होऊन शेकडो वाहने, अनेक दुकाने जाळली. यामध्ये कोट्यवधींचे नुकसान झाले. पथकाने सोमवारपासूनच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. घटनास्थळावर जाऊन दंगलीशी संबंधितविविध पुरावे गोळा केले जात आहेत.

नागरिकांकडे असलेले मोबाईल शूटिंग, सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यात येत आहे, तसेच घटनास्थळावर पडलेल्या रॉकेलच्या बाटल्या, दगड, पेट्रोलने भरलेल्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. विविध पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने लोकांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.

मोबाईल कॅमेरेच तपासाचा केंद्रबिंदूशुक्रवारी रात्री शहरात उसळलेल्या दंगलीचे मोबाईल कॅमेऱ्यामध्ये असंख्य नागरिकांनी चित्रीकरण केले. नागरिकांनी केलेले चित्रीकरणच पोलीस तपासासाठी उपयुक्त ठरत आहे. या आधारावरच पोलिसांनी तपासाची पुढील दिशा ठरविण्यास सुरुवात केली असून, दंगलीशी संबंधित अनेक पुरावे जमा करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. ज्या नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमे-याद्वारे चित्रीकरण केले होते त्याचे व्हिडिओच सोशल मीडियावर अपलोड केले. मंगळवारी दिवसभर शहरात व्हिडिओची देवाण-घेवाण सुरू होती. स्मार्ट सिटींतर्गंत शहरात तब्बल १८०० सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. हे काम मागील एक ते दीड वर्षापासून रखडले

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस