शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

४ केंद्रांवरील तपास अहवाल ८ दिवसांत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:30 IST

जालना केंद्रावरील तूर खरेदी प्रकरणी चंदनझिरा पोलिसांत ४९ शेतकरी, १८ व्यापाºयांसह ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना केंद्रावरील तूर खरेदी प्रकरणी चंदनझिरा पोलिसांत ४९ शेतकरी, १८ व्यापाºयांसह ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सातोना, परतूर, अंबड आणि तीर्थपुरी येथील नाफेडच्या हमीभाव तूर खरेदी केंद्रांवरील बोगस नावांवर केलेल्या तूर विक्रीचा तपास अहवाल आगामी आठ दिवसांत सादर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.जालना कृषी बाजार समिती आवारात असलेल्या नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर शेतकºयांच्या नावावर व्यापाºयांनीच तूर विक्री केल्याच्या तक्रारींची दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी तपास केला. कागदपत्रांची छाननी केल्यानंतर यात ८४०० शेतकºयांची नावे संशयास्पद असल्याचे समोर आले. जालना केंद्रावरील तूर खरेदीचा तपास पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शुक्रवारी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील केंद्रावर शेतकºयांच्या नावे तूर विक्री करणाºया १८ व्यापाºयांसह ४९ शेतकºयांवर चंदनिझरा पोलीस ठाण्यात कलम ४६७, ४६८, ४२०, ४०९, ३४ व जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. एप्रिल व मे महिन्यात ४९ शेतकºयांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ९२ लाख, ५७ हजार ८५९ रुपये किमतीची तूर नाफेड केंद्रावर विकली. पैकी ८४ लाख नऊ हजार ८३३ रुपये ‘आरटीजीएस’द्वारे व्यापाºयांच्या खात्यावर वर्ग केले, असे साहाय्यक निबंधक विष्णू रोडगे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे. जालना केंद्रावरील तुरीचा तपास सुरु असतानाच एक महिन्यानंतर सातोना, परतूर, अंबड आणि तीर्थपुरी येथील केंद्रांवरही अशाच पद्धतीने तूर विक्री झाल्याचे उघडकीस आले. या चारही केंद्रांवरील तुरीचा आढावा शुक्रवारी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.