शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

बालकाच्या हत्येचा तपास लागेना..!

By admin | Updated: February 21, 2017 22:59 IST

कळंब : तालुक्यातील पिंपळगाव (डो़) येथील सहा वर्षीय बालकाच्या निर्घृण खून प्रकरणाला जवळपास २५ दिवसांचा कालावधी लोटला आहे़

कळंब : तालुक्यातील पिंपळगाव (डो़) येथील सहा वर्षीय बालकाच्या निर्घृण खून प्रकरणाला जवळपास २५ दिवसांचा कालावधी लोटला आहे़ इतका वेळ उलटूनही पोलिसांना या हत्येमागचे सूत्रधार पकडण्यात यश आलेले नसल्याने सदर घटनेचा तपास सीआयडीकडे सोपविण्याची मागणी होत आहे़ पिंपळगाव (डोळा) येथील सहा वर्षीय बालक कृष्णा इंगोले याची २५ जानेवारी रोजी हत्या करण्यात आली होती़ हा प्रकार अंधश्रध्देतून झाला असावा, हा नरबळीचा प्रकार असावा असा संशय नागरिकांमधून व्यक्त होत आहे़ या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळाजवळ हत्यार म्हणून वापरलेल रूमणे जप्त केले आहे़ त्याच परिसरात काही दिवसांनी कृष्णाची चप्पलही पोलिसांना आढळून आली होती़ या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपीचे स्केच जारी केले होते़ काहीना तपासासाठी ताब्यात घेऊन चौकशी केली़ मूळचे पिंपळगाव (डोळा) येथील व सध्या पुणे येथे वास्तव्याला असलेल्या एका दाम्पत्यासह एका बुवाला पोलिसांनी अटक केले होते़ मात्र, त्यांच्याकडूनही फारसे काही हाती लागले नसल्याचे सूत्रांनी सांगितले़ जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही या प्रकरणी काही जणांची कळंब पोलीस ठाण्यात मॅरेथॉन चौकशी केली़ परंतू त्यामधूनही काही निष्पन्न न झाल्याने कृष्णाची हत्या अजूनही गूढच बनली आहे़ अंधश्रध्देतून हा प्रकार घडला असावा, याच दिशेने सध्या पोलिसांचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे़ विशेष म्हणजे कळंब पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करीत आहे़ एकाही यंत्रणेला या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाता आलेले नाही़ त्यामुळे हा तपास आता प्रभावी यंत्रणेकडे द्यावा, अशी मागणी होत आहे़या सहा वर्षीय चिमुकल्याच्या हत्येनंतर पिंपळगाव परिसरात अजूनही भितीचे वातावरण आहे़ वाडी-वस्त्यावर राहणाऱ्यांमध्ये त्यांच्या लहान मुलांसाठी काळजी व्यक्त केली जात आहे़ पोलीस यंत्रणा कृष्णाची हत्या करणाऱ्यांना जेरबंद करण्यात अयशस्वी ठरली आहे़ कृष्णा ज्या शाळेत शिकत होता त्या शाळेतील मुलांसह पालकामंध्येही भितीचे वातावरण असून, कृष्णाचे काय झाले ? असा सवाल उपस्थित केला जात आहे़ (वार्ताहर)