शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटन येथून आलेल्या ७ नागरिकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:02 IST

औरंगाबाद : ब्रिटनमध्ये नवीन विषाणूने कहर करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र शासनाने खबरदारीसाठी रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. औरंगाबाद ...

औरंगाबाद : ब्रिटनमध्ये नवीन विषाणूने कहर करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र शासनाने खबरदारीसाठी रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. औरंगाबाद शहरात ब्रिटन येथून एकूण ९ नागरिक दाखल झाले. त्यापैकी ७ जण शहरात वास्तव्याला आहेत. महापालिकेने मंगळवारी सातही नागरिकांची कोरोना तपासणी केली. उद्या त्यांचा अहवाल प्राप्त होईल, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांनी दिली.

कोरोना संसर्गामुळे संपूर्ण जग त्रस्त असताना ब्रिटनमध्ये नवीन विषाणूने जन्म घेतला आहे. कोरोनापेक्षा हा विषाणू ७० पटीने वेगाने पसरत असल्याच्या बातम्या झळकत आहेत. महाराष्ट्र शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व महापालिका हद्दीमध्ये रात्रीची संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत औरंगाबाद शहरात मागील काही दिवसांमध्ये ब्रिटन येथून नऊ नागरिक आले आहेत. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली. विमानतळावरूनही माहिती मिळविण्यात आली. ब्रिटन येथून परतलेले हे नागरिक सध्या कुठे आहेत, त्याचा शोध सुरू झाला. मंगळवारी तातडीने ९ नागरिकांचा शोध लावण्यात महापालिकेला यश आले. एक नागरिक औरंगाबाद विमानतळावरून बुलडाणाकडे रवाना झाले. दुसरा नागरिक वाळूज परिसरात राहत आहे. उर्वरित ७ नागरिक शहरात वास्तव्याला आहेत. त्यांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले आहेत. बुधवारी यासंबंधीचा अहवाल महापालिकेला प्राप्त होईल, अशी माहिती पाडळकर यांनी दिली.