शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागात १० आधुनिक पेट्रोलिंग कार दाखल

By admin | Updated: July 25, 2016 01:07 IST

औरंगाबाद : वन विभागात १० आधुनिक पेट्रोलिंंग कार दाखल झाल्या असून यामुळे गस्ती पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्वरित मदतीसाठी पोहोचणे शक्य होणार आहे.

औरंगाबाद : वन विभागात १० आधुनिक पेट्रोलिंंग कार दाखल झाल्या असून यामुळे गस्ती पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्वरित मदतीसाठी पोहोचणे शक्य होणार आहे. वन्यजीवासंदर्भात नागरिकांनी वन विभागाला कळविले असता मदत मिळण्यास विलंब होत असे, या आता कारमुळे जखमी व्यक्तीला लगेच मदत मिळू शकते. वन्यप्राणीही जखमी असल्यास त्यास वाहनातून दवाखान्यापर्यंत नेणे शक्य होणार आहे. वन क्षेत्रातून वन्यजीव पाणी व अन्नाच्या शोधात शहरात येत आहेत. मानवानेच दूरवर त्यांच्या घरापर्यंत अतिक्रमण केल्याने या घटना वारंवार शहरी भागात उद्भवत आहेत. शहरालगत वन विभागाने पिंजरे लावून बिबट्यांना पकडण्याचे प्रयत्न अनेक वेळा असफल झालेले आहेत. एकीकडे शेतकरी ‘आम्हाला बिबट्या दिसला’ असे म्हणतात तर दुसरीकडे वन अधिकारी सांगतात की तो बिबट्या नसून ‘तरस’ असावा. त्यामुळे नागरिकही विश्वास ठेवतात. परंतु काही काळाने या घटनेची पुनरावृत्ती होते. अशा वेळी वन विभागाची मोठी पंचाईत होते. आता पिंजरा घटनास्थळापर्यंत नेता येईल, एवढी जागा पेट्रोलिंग कारमध्ये उपलब्ध करून दिली आहे. तसेच गाडीवरील वन विभागाचे सिंम्बॉलही वाहनाची ओळख करून देते, ज्या प्रकारे पोलिसांची गस्ती पथकाची व्हॅन दिसली की, सर्वसामान्यांना सुरक्षितता वाटते. त्याच प्रकारे आता वन विभागाच्या या कारमुळे वन मजूर, कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढणार आहे.