शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

अर्जांच्या छाननीत दिग्गजांची धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:27 IST

महापालिका निवडणुकीत सोमवारी उमेदवारी अर्जांच्या छाननीत दिग्गजांची धाकधूक रात्री उशिरापर्यंत कायम होती. उमेदवारी अर्जाची संख्या आणि आॅनलाईन प्रणालीचा घोळ यामुळे रात्री उशिरापर्यंत नेमके किती अर्ज वैध ठरले आणि किती अवैध ठरले, याची माहिती निवडणूक विभाग देऊ शकला नव्हता. रात्री १० वाजेपर्यंत ११५२ पैकी ९०१ अर्ज वैध तर ८२ अर्ज अवैध ठरले असल्याचे सांगण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: महापालिका निवडणुकीत सोमवारी उमेदवारी अर्जांच्या छाननीत दिग्गजांची धाकधूक रात्री उशिरापर्यंत कायम होती. उमेदवारी अर्जाची संख्या आणि आॅनलाईन प्रणालीचा घोळ यामुळे रात्री उशिरापर्यंत नेमके किती अर्ज वैध ठरले आणि किती अवैध ठरले, याची माहिती निवडणूक विभाग देऊ शकला नव्हता. रात्री १० वाजेपर्यंत ११५२ पैकी ९०१ अर्ज वैध तर ८२ अर्ज अवैध ठरले असल्याचे सांगण्यात आले़महापालिका निवडणुकीत २० प्रभागातील ८१ वॉर्डासाठी २३ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. अंतिम मुदतीपर्यंत ११५२ अर्ज प्राप्त झाले होते. या अर्जांची मनपा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात छाननी सुरु होती. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्र. १ मध्ये तरोडा खुर्द, तरोडा बु.,सांगवी, हनुमानगड या चार प्रभागातील उमेदवारांची छाननी सुरु होती. येथे २२४ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील १९६ अर्ज वैध ठरले तर २४ अर्ज अवैध ठरले. निवडणूक अधिकारी कार्यालय क्र. २ येथे भाग्यनगर, गणेशनगर, श्रावस्तीनगर या तीन प्रभागातील १४८ उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, त्यात १२६ अर्ज वैध तर १२ अर्ज अवैध ठरले. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्र. ३ येथे प्रभाग ८ ते १० मधील शिवाजीनगर, नवा मोंढा आणि दत्तनगर प्रभागातील छाननी करण्यात आली. प्राप्त झालेल्या २०२ अर्जापैकी छाननीअंती १८ अर्ज अवैध ठरले आणि १८४ अर्ज वैध ठरले आहेत. निवडणूक अधिकारी कार्यालय क्र. ४ येथे १६७ पैकी ७९ अर्ज वैध ठरले तर अवैध ठरलेल्या अर्जाची संख्या मात्र समजू शकली नाही.निवडणूक अधिकारी कार्यालय क्र. ५ येथे १९४ पैकी १४९ अर्ज वैध ठरले तर १४ अर्ज अवैध ठरले आहेत़ निवडणूक अधिकारी कार्यालय क्र.६ मधये ११९ पैकी ८७ अर्ज वैध ठरले तर ३२ अर्ज अवैध ठरले आणि निवडणूक अधिकारी कार्यालय क्र. ७ येथे ९८ पैकी ७० अर्ज वैध ठरले आणि ७ अर्ज अवैध ठरल्याची माहिती देण्यात आली.दरम्यान, या छाननीमध्ये अनेक दिग्गजांचे अर्ज अवैध ठरल्याची चर्चा सुरु होती. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून मात्र कोणताही अधिकृत निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले. निवडणूक अधिकारी कार्यालय क्र. ७ येथे प्रभाग १९ व २० मधील उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात आली. यामध्ये राष्टÑवादीच्या जयश्री जिंदम, सरस्वती हनवते, सपना सूर्यवंशी यांच्या शपथपत्रावर स्वाक्षºया नसल्याचा आक्षेप घेण्यात आला. या आक्षेपानंतर हे अर्ज त्रुटी दाखवत बाद करण्यात आले.प्रभाग २० मध्येच राष्टÑवादीचे बजरंग भेंडेकर यांचीही शपथपत्रावर स्वाक्षरी नसल्याची बाब पुढे आली. तो अर्जही बाद करण्यात आला. त्याचवेळी जयश्री टेळकीकर, आसेफ खान, देवानंद सरोदे यांच्या अर्जातही त्रुटी आढळून आल्याने ते बाद करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.