शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एसईबीसीपेक्षा"""" कमी गुणवत्ताधारक """"ईडब्ल्यूएस"""" उमेदवारांना नियुक्त्या न देण्याचा अंतरिम आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:29 IST

औरंगाबाद : ''''एसईबीसी'''' प्रवर्गातील (मराठा) उमेदवारापेक्षा कमी गुणवत्ता असणाऱ्या ''''ईडब्ल्यूएस'''' प्रवर्गातील उमेदवारांना ज्युनिअर इंजिनिअर ट्रेनी व डिप्लोमा ...

औरंगाबाद : ''''एसईबीसी'''' प्रवर्गातील (मराठा) उमेदवारापेक्षा कमी गुणवत्ता असणाऱ्या ''''ईडब्ल्यूएस'''' प्रवर्गातील उमेदवारांना ज्युनिअर इंजिनिअर ट्रेनी व डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी (पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी व पदविका अभियंता प्रशिक्षणार्थी ) पदावर याचिकेच्या पुढील सुनावणीपर्यंत नियुक्ती न देण्याचे अंतरिम आदेश न्या. एस .व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एस. डी. कुलकर्णी यांनी ११ डिसेंबर रोजी महावितरणला दिले. याचिकेची पुढील सुनावणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे.

महावितरण कंपनीने पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थीच्या २८ आणि पदविका अभियंता प्रशिक्षणार्थीच्या ३२७ पदांसाठी जाहिरात दिली होती. याचिकाकर्ते आणि इतर उमेदवारांनी मराठा आरक्षणाअंतर्गत एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केले होते. परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर याचिकाकर्त्यांची नावे निवड यादीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. नाशिक येथे कागदपत्रांची पडताळणी झाली. सदर उमेदवारांची तात्पुरती नियुक्ती दर्शवून महावितरण कंपनीने याचिकाकर्ते तसेच इतर निवड झालेल्या उमेदवारांचे त्यांच्या कार्यालयामार्फत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी प्रस्तावही सादर केले. परंतु पुढे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नियुक्तीपत्रे दिली नाही.

एसईबीसी मराठा प्रवर्गाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांपूर्वी स्थगित केले. त्यामुळे महावितरण कंपनीने एसईबीसी मराठा प्रवर्गाच्या जागा बाजूला ठेवून इतर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याची हालचाल सुरू केली आहे.

त्यामुळे याचिकाकर्ते अविनाश आव्हाड, सतीश शिंगोटे, परमेश्वर भालके, भारती अंभोरे आणि भागवत घाडगे यांनी ॲड. अमोल चाळक पाटील यांच्यामार्फत खंडपीठात आव्हान दिले.

ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्ती आदेश न देण्याची विनंती केली आहे.