शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
3
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
4
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
5
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
6
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
7
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
8
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
9
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
10
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
11
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
12
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
13
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
14
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
15
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
16
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
17
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
18
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
19
न बोलता कृतीतून शिकवणाऱ्या ‘जीजीं’ची पाखर
20
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!

पाणीपट्टीच्या थकबाकीवर आता व्याजाची आकारणी

By admin | Updated: November 28, 2015 00:47 IST

औरंगाबाद : मालमत्ता कराप्रमाणे आता शहरवासीयांना पाणीपट्टीच्या थकबाकीवरही व्याजाचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने पाणीपट्टीच्या

औरंगाबाद : मालमत्ता कराप्रमाणे आता शहरवासीयांना पाणीपट्टीच्या थकबाकीवरही व्याजाचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने पाणीपट्टीच्या थकबाकीवर १८ टक्के वार्षिक दराने व्याजाची आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही आकारणी १ डिसेंबरपासून सुरू होणारआहे. महानगरपालिकेने शहराची पाणीपुरवठा यंत्रणा १ सप्टेंबर २०१४ पासून समांतरच्या ठेकेदार कंपनीकडे सोपविली आहे. तेव्हापासूनच पाणीपट्टी वसुलीचे कामही सिटी वॉटर युटिलिटी कंपनी करीत आहे. समांतर जलवाहिनी योजनेचे काम करणाऱ्या या कंपनीकडून दर दोन महिन्यांनंतर पाणीपट्टीची बिले वाटप केली जात आहेत. त्यातच आता या कंपनीने पाणीपट्टीच्या थकबाकीवर वार्षिक १८ टक्के दराने व्याज आकारणीचा निर्णय घेतला आहे.३० नोव्हेंबरनंतर त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. आतापर्यंत मनपाकडून पाणीपट्टीच्या थकबाकीवर व्याज आकारणी होत नव्हती. कंपनीने पहिल्यांदाच अशा प्रकारे नियमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. मनपाने चालू वर्षापासून एप्रिल महिन्यापासून मालमत्ता कराच्या थकबाकीवर वार्षिक २४ टक्के दराने व्याज आकारणे सुरू केले आहे. याच नियमाचा आधार घेऊन कंपनीने पाणीपट्टीच्या थकबाकीवर व्याज आकारणीचा निर्णय घेतला आहे. सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडून सप्टेंबर महिन्याचे पाणी बिलांचे वाटप झाले आहे; परंतु अनेक ग्राहकांना चुकीची बिले मिळाली आहेत. यातील काही बिले अव्वाच्या सव्वा आहेत. त्यामुळे ही बिले पाहून नागरिकांचे डोके चक्रावले.४दरम्यान, कंपनीचे जनसंपर्क अधिकारी राहुल मोतियाळे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ग्राहक सेवा केंद्रांवर चुकीची बिले दुरुस्त करून देण्यात येतील, असे सांगितले.४कंपनीने शहरातील सर्व प्रभाग कार्यालयांत ग्राहक सेवा केंदे्र उघडली आहेत. मनपा प्रशासकीय इमारत, क्रांतीचौक, जुना मोंढा, सिडको कार्यालय, जवाहर कॉलनी पोलीस ठाण्याजवळ, अशा ठिकाणी ही ग्राहक सेवा केंद्रे कार्यरत असून, तिथे नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहनही मोतियाळे यांनी केले.