शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

आंतरजिल्हा आपसी बदलीत शिक्षकांकडून सौदा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2016 23:02 IST

लातूर आंतरजिल्हा आपसी बदलीसाठी जिल्ह्यात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या शिक्षकांच्या आपसात वाटाघाटी होण्याचे प्रमाण वाढले आहे़

हणमंत गायकवाड लातूरआंतरजिल्हा आपसी बदलीसाठी जिल्ह्यात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या शिक्षकांच्या आपसात वाटाघाटी होण्याचे प्रमाण वाढले आहे़ खासकरून सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले स्थानिक शिक्षक पर जिल्ह्यातून येणाऱ्या शिक्षकांसोबत सौदा करून बदली करून घेत आहेत़ २०११ ते २०१६ या कालावधीत जवळपास ३५० आंतरजिल्हा बदल्या झाल्या असून, त्यातील २२५ ते २५० स्थानिक शिक्षकांनी परजिल्ह्यात आपसी बदल्या करून घेतल्या आहेत़ येणाऱ्यांकडून १० ते १५ लाख रूपये खिशात टाकून ते परजिल्ह्यात गेल्याच्या चर्चा आहेत़ या ‘आपसी’ वाटाघाटीत किती शिक्षकांनी खिसा गरम करून घेतला, हे नक्की उघड झाले नसले तरी लातूरच्या शैक्षणिक वर्तुळात याची चवीने चर्चा सुरू झाल्याने ‘मास्तर तुम्ही सुद्धा?’ असे म्हणण्याची वेळ आली आहे़ परजिल्ह्यातून आपल्या स्थानिक लातूर जिल्ह्यात येणाऱ्या तरूण शिक्षकांचे १ हजार ६०९ प्रस्ताव लातूर जि़पक़डे आहेत़ यातील ७६ शिक्षकांना लातूर जि़प़च्या शिक्षण विभागाची काही दिवसांपूर्वीच नाहरकत मिळाली आहे़ पण, लातूर जिल्ह्यातून परजिल्ह्यात जाणाऱ्या शिक्षकांचे केवळ ९० प्रस्ताव आहेत़ आंतरजिल्हा बदलीसाठी जागा नसल्यामुळे येणाऱ्यांना नाहरकत मिळत नाही़ त्यामुळे आपसीतून वाटाघाटीचा ‘लातूर पॅटर्न’ नावारूपास येत आहे़ लातूर जिल्ह्यातील स्थानिक असलेले आणि सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले काही शिक्षक पैशाच्या लोभापायी परजिल्ह्यात आपसीकरून जात आहेत़ २०११ ते २०१६ या कालावधीत ३५० आंतरजिल्हा बदली झाल्या़ त्यातील २२५ ते २५० आपसी बदल्यातील शिक्षक दीड ते दोन वर्षाच्या सेवानिवृत्तीवर आलेले होते़ त्यामुळे ते संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत़ ३५० पैकी ८० ते १०० बदल्याच नियमानुसार झाल्याचे म्हंटले जाते़ विशेष म्हणजे बदल्या करून घेतलेले बहुतांश शिक्षक स्थानिकचे रहिवाशी आहेत़ सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना ते परजिल्ह्यात स्वखुशीने का गेले असावेत? असा, प्रश्न उपस्थित झाला आहे़ याशिवाय, बदलीच्या ठिकाणी गेल्यानंतर अनेकांनी रजा जास्त वापरल्या व निवृत्त होताच पुन्हा लातूर गाठून सेवानिवृत्तीचा आनंद घेत आहेत़ यापैकी काही शिक्षकांनी येणाऱ्यांकडून सौदा केल्याचे उघड-उघड बोलले जात आहे़ मात्र कुणी सौदा केला हे गुलदस्त्यातच आहे़ खुल्या प्रवर्गातील शिक्षकांच्या वाटाघाटी १० ते १५ लाख आणि इतर प्रवर्गातील शिक्षकांच्या बदल्यांसाठी ९ ते १० लाखापर्यंत आपसात वाटाघाटी झाल्याचे बोलले जात आहे़ जाणारे शिक्षक सेवानिवृत्तीच्या वाटेवरले तर येणारे १० ते १२ वर्षे सेवा झालेले शिक्षक आहेत़ जास्तीत जास्त २ वर्षे सेवा राहिलेल्या शिक्षकांनीच आपसी बदल्या करून घेतल्याने हा संशय बळावला आहे़