शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाड्याने घेतलेल्या ट्रॅक्टरची परस्पर विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 01:13 IST

कामासाठी भाडेतत्त्वावर घेतलेल्या ट्रॅक्टरची परस्पर विक्री करणा-या एका रॅके टचा ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी पर्दाफाश केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कामासाठी भाडेतत्त्वावर घेतलेल्या ट्रॅक्टरची परस्पर विक्री करणा-या एका रॅके टचा ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी पर्दाफाश केला. रॅॅकेटमधील दोन जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांनी राज्यातील विविध ठिकाणच्या शेतक-यांना विक्री केलेले १७ ट्रॅक्टर आणि एक कार असा सुमारे ७४ लाखांचा ऐवज जप्त केला.शेख अन्वर शेख मुसा (रा. हुसेननगर, सातारा) आणि देवीलाल सरदारसिंग राजपूत (रा. पांगरा, ता. कन्नड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ग्रामीण गुन्हे शाखेचे निरीक्षक सुभाष भुजंग म्हणाले की, पिसादेवी येथील रहिवासी भगवान विष्णू वायाळ यांनी चिकलठाणा पोलिसांना दिलेल्या तक्रारीत त्यांचे ट्रॅक्टर आरोपी शेख अन्वर आणि शेख इब्राहीम ऊर्फ शेख इस्माईल यांनी त्यांच्याकडून ट्रॅक्टर भाड्याने नेले आणि नंतर ते परस्पर गायब केले, तर अशाच प्रकारची दुसरी तक्रार कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात बळीराम साहेबराव राठोड (रा. आंबा तांडा, कन्नड) यांनी नोंदविली होती. यावरून आरोपी शेख शकील शेख शब्बीर (रा. श्रीराम कॉलनी, कन्नड), देवीलाल सरदारसिंग राजपूत (रा. पांगरा, ता. कन्नड) आणि नासेर शेख रसूल शेख (रा. मोमीनपुरा, कन्नड) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. कन्नड पोलीस आणि ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. गुन्हे शाखा पोलिसांनी शेख अन्वर यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच भगवान यांचा ट्रॅक्टर त्याने त्याचा साथीदार देवीलाल राजपूत याने विविध ठिकाणी विक्री केल्याची क बुली दिली. नंतर कन्नड पोलिसांनी देवीलाल यास पकडले. यानंतर दोन्ही पोलिसांनी संयुक्त तपास केला. या तपासात दोन्ही आरोपींनी सांगितले की, आरोपी हे स्वत:ला मोठा कॉन्ट्रॅक्टर असल्याचे सांगून ट्रॅक्टरमालकाचा विश्वास संपादन करीत. चालक आमचा असेल आणि इंधनही आम्हीच टाकू तुम्ही केवळ ट्रॅक्टर द्या, आम्ही तुम्हाला दरमहा भाडे देत राहू, असे सांगून विश्वास संपादन करीत. बहुतेक ट्रॅक्टरवर कर्जाचा बोजा असतो. कर्जाचे हप्ते परतफे ड होईल या आशेपोटी आरोपींकडे ट्रॅक्टर सुपूर्द करीत. यानंतर आरोपी ट्रॅक्टरची बनावट कागदपत्रे तयार करून ते विविध जिल्ह्यांत विक्री करीत.