शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

अवचट यांच्याशी संवाद; नितांतसुंदर मैफलीचा खळाळता अनुभव

By admin | Updated: October 17, 2014 23:55 IST

औरंगाबाद : डॉ. अनिल अवचट या बहुआयामी अवलियाच्या अंगातील नाना कळा अनुभवताना रसिकही मंत्रमुग्ध झाले.

औरंगाबाद : एखाद्या शाळकरी मुलाच्या भाबडेपणाने ओरिगामीच्या कागदी वस्तूंची प्रात्यक्षिके दाखवताना हरखलेले, सहज साध्या शैलीत चित्रे काढताना रेषांमध्ये रमलेले, हाती बासरी घेत ती वाजवताना हरवलेले, मध्येच डायरी काढून कविता वाचणारे, तारुण्यात अनुभवलेल्या बिहारच्या दुष्काळाविषयी बोलताना भावुक झालेले, अशा डॉ. अनिल अवचट या बहुआयामी अवलियाच्या अंगातील नाना कळा अनुभवताना रसिकही मंत्रमुग्ध झाले. जागतिक भूलशास्त्र दिनाचे औचित्य साधत इंडियन मेडिकल असोसिएशनने डॉ. अवचट यांची प्रकट मुलाखत आयोजित केली होती. भूलतज्ज्ञ डॉ. सुहास जेवळीकर यांनी त्यांना बोलते करीत दिलखुलास संवाद साधला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. छाया दिवाण अध्यक्षस्थानी होत्या. डॉ. योगिनी पत्की यांनी सूत्रसंचालन केले. अश्विनी सूर्यवंशी यांनी आभार मानले.डॉ. अवचट यांनी ओतूर या आपल्या गावाच्या जिव्हाळ्याच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले की, रूढ शिक्षण पद्धतीने आणि त्यानुसार चालणाऱ्या शाळेने मला न्यूनगंड दिला; पण पुढे ओरिगामी, बासरीवादन, गायन, चित्रकला अशा विविध छंदांकडे वळल्याचे अवचट यांनी सांगितले. सजग समाजभान दाखवत घडलेला कार्यकर्ता आणि लेखक असा स्वत:चा प्रवास मांडताना त्यांनी ज्येष्ठ समाजवादी एस.एम. जोशी व हमाल पंचायतीचे प्रणेते डॉ. बाबा आढाव यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, वैद्यकीय अभ्यासक्रमाला शिकत असताना बिहारच्या दुष्काळात काम करताना जयप्रकाश नारायण, भूमी मुक्ती आंदोलनात एसेम व ‘एक गाव, एक पाणवठा’ चळवळीत डॉ. बाबा आढाव यांनी भोवताली पाहण्याची एक नवी दृष्टी दिली. मला खरोखर सर्जन व्हायचेय का, असा प्रश्न मला पडला आणि विचारांती मी सामाजिक कार्याकडे वळलो. या सगळ्या प्रवासात सर्वार्थाने सहचारिणी बनून साथ देणाऱ्या सुनंदातार्इंविषयी बोलताना अवचटांनी मनाचा एक हळवा कप्पा उघडला. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या उभारणीपासून कर्करोगग्रस्त झाल्यावरही अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत असणाऱ्या डॉ. सुनंदा अवचट यांच्या आठवणी सांगताना एका सुंदर, समर्पित सहजीवनाचे दर्शन त्यांनी घडवले.