या निर्देशानुसार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या हद्दीतील पोलीस ठाण्याला भेट द्यावी. तिथे तीन तास वेळ देऊन परिसर, अभिलेख तपासणी, गुन्हे अर्ज चौकशी प्रकरणांचा आढावा घ्यावा. पोलीस ठाणे अंमलदार यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्यात आणि नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करावे, असे म्हटले आहे. या अनुषंगाने गंगापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी ८, १० व १२ मार्च या दिवशी अनुक्रमे देवगाव रंगारी, गंगापूर व शिल्लेगाव या पोलीस ठाण्यात सकाळी १० ते १ वाजेपर्यंत भेट देणार आहेत. नागरिकांनी या कालावधीत आपल्या तक्रारींचे निवारण, प्रलंबित अर्ज चौकशी प्रकरणे व इतर मदतीकरिता उपस्थित रहावे. जेणेकरून आपला वेळ, पैसा वाचेल आणि कोविडचा संसर्ग होण्याचा धोका कमी होईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
तक्रारी निवारण करण्याचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:05 IST