शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण
2
Mumbai: १४ पाकिस्तानी ४०० किलो आरडीएक्ससह देशात घुसले
3
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
4
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज
5
महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी
6
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
7
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
8
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
9
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
10
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
11
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
12
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
13
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
14
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
15
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
16
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
17
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
18
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
19
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
20
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...

पोलिस निरीक्षकांना निर्देश ं

By admin | Updated: July 25, 2016 00:40 IST

लातूर : उदगीर तालुक्यातील कल्लूरनजीक झालेल्या भीषण अपघातानंतर पोलिस आणि त्यांच्या नातेवाईकांकडून अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

लातूर : उदगीर तालुक्यातील कल्लूरनजीक झालेल्या भीषण अपघातानंतर पोलिस आणि त्यांच्या नातेवाईकांकडून अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांनी आपल्या किती कर्मचाऱ्यांकडे प्रवासी वाहने आहेत, याची माहिती संकलित करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या पोलिस निरीक्षकांना दिले आहेत. लातूर जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांना ‘ग्रुप’ कॉलव्दारे आपल्या हद्दीत सुरु असणाऱ्या अवैध धंद्यांना आवर घालण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या असून, ज्या दिवशी या सूचना दिल्या होत्या त्याच दिवशी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास अहमदपूर-उदगीर राज्य मार्गावरील कल्लूर ते एकुर्का रोड दरम्यान कंटनेर-जीपचा भीषण अपघात झाला. आपल्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीला खतपाणी घालणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांनी जिल्ह्याचा पदभार घेतल्यानंतर प्रथमत: दिला होता. मात्र, हा इशारा गांभीर्याने न घेणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. अपघातानंतर रस्त्यावर धावणाऱ्या अवैध प्रवासी वाहनांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भागिदारी असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आपल्या विश्वासू कर्मचाऱ्यांना याबाबतची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी, पोलिस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. ४जिल्हा पोलिस दलातील काही कर्मचाऱ्यांनी आपला मुलगा, पत्नी, भाऊ आणि जवळच्या नातेकवाईकांच्या नावे प्रवासी वाहतुकीसाठी वाहन खरेदी केल्याचे पुढे आले आहे. परिणामी, या वाहनांना पोलिस दलातील आपले वजन वापरुन बळ दिले जात आहे. जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवर ही वाहन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून धावत असल्याची चर्चा जिल्हा पोलिस दलात सुरु झाली. याबाबत माध्यमातून वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी याबाबतची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत.जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, निलंगा, देवणी, चाकूर, जळकोट, औसा, रेणापूर आणि शिरुर अनंतपाळ तालुक्यातील महत्त्वाच्या मार्गावर धावणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीत पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांची वाहने असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांना मिळाल्यानंतर, त्यांनी या माहितीची खातरजमा करण्यासाठी खास विश्वासातील कर्मचाऱ्यांवर काम सोपविले आहे.४जिल्ह्यातील आपल्या हद्दीत अवैध व्यवसायाला खतपाणी घालत पाठबळ देणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून, त्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी अशा अवैध व्यवसायाला पाठिशी न घालता आपल्या हद्दीतील अवैध व्यवसाय बंद करावेत, कायदा आणि सुव्यवस्था कायम अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. अवैध व्यवसायात ज्यांचा-ज्यांचा सहभाग राहील, अशा दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांनी दिली आहे.