शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

झोपण्याऐवजी अपंगांनी मांडला ठिय्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 19:07 IST

प्रहार अपंग क्रांती आंदोलन या अपंगांसाठी काम करणा-या संघटनेने मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर ' झोपा काढो ' आंदोलन आयोजित केले होते. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जिल्हा परिषदेत जमलेल्या अपंगांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला व घोषणाबाजी सुरू केली.

ठळक मुद्देजिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अधिकारी- कर्मचा-यांनी अपंगांना विविध योजनांपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवल्याच्या निषेधार्थ आज प्रहार अपंग क्रांती आंदोलनच्या कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या दालनासमोर ठिय्या मांडला.जिल्हा परिषदेत जमलेल्या अपंगांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला व घोषणाबाजी सुरू केली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिका-यांनी आंदोलनकर्त्यांना सामोरे जाऊन योजना मार्गी लावण्यासाठी यंदा कुचराई होणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यानंतर हे आंदोलन लगेच समाप्त झाले.

ऑनलाईन लोकमत

औरंगाबाद, दि. १ : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अधिकारी- कर्मचा-यांनी अपंगांना विविध योजनांपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवल्याच्या निषेधार्थ आज मंगळवारी प्रहार अपंग क्रांती आंदोलनच्या कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या दालनासमोर ठिय्या मांडला. दरम्यान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिका-यांनी आंदोलनकर्त्यांना सामोरे जाऊन योजना मार्गी लावण्यासाठी यंदा कुचराई होणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यानंतर हे आंदोलन लगेच समाप्त झाले.

प्रहार अपंग क्रांती आंदोलन या अपंगांसाठी काम करणा-या संघटनेने मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर ' झोपा काढो ' आंदोलन आयोजित केले होते. तथापि, या संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे हे सकाळीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अपंगांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांची व सुरक्षारक्षकासोबत शाब्दीक चकमक उडाली. तेव्हा झालेल्या धक्काबुक्कीत ते जखमी झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेतील आंदोलनात सहभागी होऊ शकले नाही. पूर्वनियोजिति या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जिल्हा परिषदेत जमलेल्या अपंगांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला व घोषणाबाजी सुरू केली. 

अपंगांनी आंदोलन सुरू केले त्यावेळी नेमके मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड कामानिमित्त कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे आंदोलनकर्त्यांची समजूत घालण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, समाजकल्याण अधिकारी सचिन मडावी पुढे आले. अपंगांच्या भावना त्यांनी जाणल्या व यंदा जिल्हा परिषदेमार्फत राबविण्याल्या जाणाºया सर्व योजना मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यामध्ये प्रामुख्याने समाजकल्याण विभागाने घरकूल योजना, बीजभांडवल योजनांसाठी लाभार्थी अपंगांकडून प्रस्ताव मागविण्यात आल्याची आंदोलनकर्त्यांना माहिती अधिकाºयांनी दिली. समाजलकल्याण विभागामार्फत सव्वा कोटी रुपयांची तरतूद घरकूल योजनेसाठी केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी अपंगांच्या खात्यावर प्रत्येकी सव्वा लाख रुपये जमा केले जाणार आहेत..