शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

पावसाऐवजी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

By admin | Updated: June 29, 2014 00:23 IST

भास्कर लांडे ल्ल हिंगोली जिल्ह्यातच हळदीचे चांगले मार्केट असल्यामुळे दोन एकरात १५ पोती खत आणि २७ हजारांचे बियाणे विकत घेवून टाकले; परंतु मान्सूनच्या पाऊस उघडून बसल्याने उन्हामुळे हळद

भास्कर लांडे ल्ल हिंगोलीजिल्ह्यातच हळदीचे चांगले मार्केट असल्यामुळे दोन एकरात १५ पोती खत आणि २७ हजारांचे बियाणे विकत घेवून टाकले; परंतु मान्सूनच्या पूर्वसंध्येला पडलेला पाऊस उघडून बसल्याने उन्हामुळे हळद करपू लागली. म्हणून पाईपलाईनद्वारे पाणी आणून तुषारमार्फत देण्याचा प्रयत्न केला. एवढा खटाटोप करून लाख रूपये घातल्यानंतही हळद उठली नसल्यामुळे घोटादेवी येथील उत्पादकाने हळहळ व्यक्त केली. अल्पश: पावसावर पेरणीचा जुगार खेळलेल्या जिल्ह्यातील प्रत्येक उत्पादकाची ही भावना असून यंदा मान्सूनच्या पाण्याऐवजी उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी येत आहे.गतवर्षी १२ जूनला आगमन झालेल्या पावसाने सातत्य राखल्याने लवकरच पेरण्या आटोपून पिके वाढण्यास सुरूवात झाली होती. यंदा देखील तशीच परिस्थिती राहील, या आशेने जिल्ह्यातील काही उत्पादकांनी धूळपेरणी केली. अगदी मान्सूनच्या सुरूवातीला पाऊस पडल्याने धूळपेरणीचा डाव साधण्याची उत्पादकांना हमी वाटली; पण चित्र पालटले, धूळपेरणीचा जुगार उत्पादकांच्या अंगलट आला. त्याचा फटका हिंगोली तालुक्यातील घोटादेवी येथील सुरेश राजाराम शेळके यांना बसला. मृगनक्षत्रात झालेल्या पावसात शेळके यांनी दोन एकरात १५ हजारांचा १५ पोती डीएपी खत टाकला. त्याआधी २९ हजारांचे हळदीचे बियाणे टाकले. मोठ्या आशेने हळद लागवड करताच पाऊस गायब झाला. उन्हाळाच संपला नसल्याने सूर्य आग ओकू लागला. जमिनीत पाणी मुरलेच नसल्यामुळे आतील उष्णतेमुळे हळद उठण्याचा विषय नव्हता. हातातील ५० हजार पेरणीला घालून आभाळाकडे बघण्याची वेळ शेळके यांच्यावर आली. महागामोलाचे खत-बियाणे टाकून फायदा होत नसल्यामुळे पश्चातापाची वेळ त्यांच्यावर आली. कोणत्याही परिस्थितीत हळदीला वाचविण्याचा निर्धार शेळके यांनी केला. दोनशे मीटर अंतरावर असलेल्या विहिरीतील पाणी पाईलाईनद्वारे आणले; पण दोन एकरातील हळदीला पुरेल, असे पाणी विहिरीत नव्हते. काहीही करून हळद वाचविण्यासाठी शेळके यांनी आणखी पैसे घातले. ३० हजार रूपये खर्चून तुषारसंच विकत आणला; पण हळद लागवड करून १० दिवस उलटले होते. त्यातच कोरडी जमीन भरमसाठ पाणी पिऊ लागली. बारा-बारा तासाच्या वीज भारनियमनामुळे त्यात बाधा येवू लागली; पण जमीन भिजेना आणि हळद उठेना, अशा संकटात शेळके सापडले. पेरणीपासून आजपर्यंत १ लाख रूपये खर्चून आभाळाकडे पहावे लागत असल्याने त्यांनी हळहळ व्यक्त केली. शेळके यांच्या प्रमाणे जिल्ह्यातील बहुतांश उत्पादक व्यक्त करीत आहेत. मान्सूनच्या पावसावर जुगार खेळण्याचा प्रयत्न आज अंगलट आला. अनेक गावातील शेतकरी लाख-लाख रूपयांना बुडाले. पदरमोड केलेल्या उत्पादकांना आज अन्न गोड लागेना. आधीच जुळवाजुळव करून पेरणीचे बियाणे विकत घेतले होते. आता कोणाकडे हात पसरावे, असा प्रश्न उत्पादकांना पडला आहे. दिवसेंदिवस पाऊस लांबतच असल्यामुळे उत्पादक पावसाचा धावा करीत आहेत; पण दुबार पेरणी केलेल्या उत्पादकांच्या कडा पाणावल्या आहेत.