शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यांच्या सीमांवर चार राज्यातून येणाऱ्यांची तपासणी

By | Updated: November 28, 2020 04:15 IST

पॉझिटिव्ह असल्यास क्वारंटाईन करणार : लॉकडाऊन नाही, मात्र नियम कडक करणार औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ...

पॉझिटिव्ह असल्यास क्वारंटाईन करणार : लॉकडाऊन नाही, मात्र नियम कडक करणार

औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात ३० नोव्हेंबर रात्री १२ वाजेपर्यत मिशन बिगीन अगेन अंतर्गत लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊन करणार नाही, मात्र नियम कडक करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात आणि मनपा हद्दीत करावयाच्या उपाययोजनांबाबत संबंधित यंत्रणांना तातडीने आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्य सचिवांकडून प्राप्त शासन आदेशानुसार दिल्ली, गुजरात, राजस्थान तसेच गोवा या राज्यातून विमान, रेल्वे अथवा रस्ते वाहतूक मार्गे येणाऱ्या प्रवाशांची कोरोनाची तपासणी करूनच राज्यात प्रवेश देण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात विमान, रेल्वे अथवा रस्ते वाहतूकमार्गे येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीचे आदेश आहेत. महापालिका प्रशासकांनी चिकलठाणा विमानतळ व रेल्वे स्टेशन येथे आरोग्य विभागाचे पथक उपलब्ध करून दिले आहे. जिल्ह्याच्या सीमांवर तपासणीसाठी पोस्ट लावण्यात येणार आहेत. विमानतळ, रेल्वेस्टेशनवर तयारी झाली आहे. दोन दिवसांत जिल्ह्यांच्या सर्व सीमांवर येणाऱ्या वाहनांंची तपासणी करण्याच्या अनुषंगाने निर्णय होणार असल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.

प्रवासी त्या राज्यातून आल्याची माहिती कळवा

दिल्ली, गुजरात, राजस्थान तसेच गोवा या राज्यातून शहरात पाहुणे आले असतील, किंवा स्थानिक वाहनातून त्यांनी प्रवास केला. अशा नागरिकांची माहिती दडवून ठेवल्यास नातेवाईकांवर देखील आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्या राज्यांतून प्रवासी आले असतील तर त्याची माहिती स्थानिक प्रशासनाला कळविल्यास कोरोना तपासणी करणे सोपे होईल, असेही ते म्हणाले.

औरंगाबादच्या यंत्रणेसाठी सूचना अशा

दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा या राज्यातून विमानतळावर येणाऱ्या विमान प्रवाशांकडे विमानतळावर येण्यापूर्वी आरटीपीसीआर चाचणीचे निगेटीव्ह अहवाल सोबत असणे आवश्यक आहे. विमानतळावर येण्यापूर्वी ७२ तास आधी चाचणीचे नमुने घेणे आवश्यक आहे. विमानतळ प्राधिकरणाने आरटीपीसीआरसाठी एजन्सी नेमली तर नाममात्र शुल्क आकारावे. प्रवाशांची पूर्ण माहिती प्राधिकरणाने ठेवावी. रेल्वेने जिल्ह्यात येण्यापूर्वी ९६ तास आधी आरटीपीसीआर चाचणीचे नमुने घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील करमाड, लासुर स्टेशन, रोटेगांव या ठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सकांनी आरोग्य पथक स्थापन करून प्रवाशांची तपासणी करावी.