महापालिकेला कोरोना निधीची प्रतीक्षा
औरंगाबाद : महापालिकेला गत सहा महिन्यांमध्ये कोरोनासाठी शासनाकडून एक रुपयाही निधी प्राप्त झालेला नाही. महापालिकेने उधारीवर वेगवेगळ्या कंपन्या आणि पुरवठादार एजन्सीकडून साहित्य खरेदी केले. साधारणपणे ३० ते ३२ कोटी रुपये महापालिकेला हवे आहेत. निधी मिळावा म्हणून वारंवार शासन आणि जिल्हा यंत्रणेकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. पुरवठादार कंपन्या निधीची प्रतीक्षा करीत आहेत. मागील बिल मिळाल्याशिवाय नवीन साहित्य देण्यास काही कंपन्यांनी नकार दिला आहे.