जालना : प्रस्तावित नागपूर- मुंबई अति जलदगती महामार्गाची विभागीय आयुक्त विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली.सदर महामार्गासाठी जमीन संपादन करताना शासनाने अमरावती आंध्रा पॅर्टननुसार योजना कार्यान्वित करून दहा वर्षांत मावेजा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयास शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी संघर्ष समिती स्थापन करून नवीन भू संपादन कायद्यान्वये बाजार भावाच्या तीनपट व एक रकमी मावेजा देण्याची मागणी केली आहे. हा लढा सध्या तीव्र होत असल्याने या प्रस्तावित मार्गाची विभागीय आयुक्त दांगट यांनी प्रत्यक्ष पाहणी करून जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. जामवाडी, गुंडेवाडी, शिवारात भेट देवून पाहणी करण्यात आली. त्यानंतर जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयाचीही पाहणी केली. या जलाशयातील गाळउपसा कामाचे कौतुकही त्यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, निवासी, तहसीलदार विपीन पाटील, उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर, नायब तहसीलदार संदीप ढाकणे यांच्यासह जलसंरक्षण मंचचे पदाधिकारी उपस्थित होते.
आयुक्तांकडून प्रस्तावित ‘एक्स्प्रेस वे’ ची पाहणी
By admin | Updated: July 14, 2016 00:30 IST