शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दर्जाहीन बियाणे विक्रेत्यांसह उत्पादकांवर गुन्हे दाखल करा

By admin | Updated: April 11, 2017 00:15 IST

जालना :दर्जाहीन बियाणे विक्रेत्यांसह उत्पादकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सोमवारी दिले.

जालना : शेतकऱ्यांना पेरणीसाठी देण्यात येणाऱ्या बी-बियाणांच्या वाणाचा दर्जा उत्तम राखण्यात यावा. बियाण्यांचा दर्जा तपासण्यासाठी भरारी पथकाच्या माध्यमातून तपासणी करण्यात यावी. या तपासणीमध्ये दोषी आढळणाऱ्या दुकानदारांसह उत्पादकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सोमवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित खरीप हंगाम २०१७ च्या पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, आ.राजेश टोपे, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सभापती दत्ता बनसोडे, रघुनाथ तौर यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाबाबत गतवर्षात बँकांनी चांगले काम केले असल्याचे सांगत गतवर्षात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक १ हजार २१६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले होते. चालू वर्षातसुद्ध मागणीनुसार अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्याचे निर्देश सर्व बँकांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, शेतकऱ्यांना वेळेवर ट्रान्सफार्मर न मिळणे, वीजजोडण्या अचानकपणे तोडणे यासारख्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहेत. महावितरणने याबाबत लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत यापुढे एकाही शेतकऱ्यांच्या किंवा लोकप्रतिनिधींची तक्रार येणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना देऊन कृषी विभागाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी आ. राजेश टोपे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीष टोपे यांनीही उपयुक्त अशा सूचना मांडल्या. सभेस विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.